आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेंभुर्णीजवळील घटना:अपघातात बॉम्ब शोधक वाहन उलटले; सहा पोलिस जखमी

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहर पोलिस बॉम्ब शोधक-नाशक पथकाचे वाहन टेंभुर्णीजवळ अपघातात उलटले. यात सहा पोलिस जखमी झाले. सोबत माया नावाचे श्वानही होते. त्याला काही झाले नाही. शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास हा प्रकार घडला. पथक पुण्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या दौऱ्यासाठी गेले होते. पण तो रद्द झाल्याने परतत होते. मागून आलेल्या आयशर टेम्पोने (एमएच ४३ बीपी ९५५७) पथकाच्या वाहनाला (एमएच १३ सीयु ०७३३) धडक दिली. यामुळे ते उलटले. जखमी झालेल्या पोलिसांवर टेंभुर्णीच्या शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. तिघांवर उपचार सुरू असून इतर तिघांना घरी सोडले आहे. पोलिस नाईक सुदर्शन गवळी यांनी टेंभुर्णी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांच्यासह प्रवीण चुंगे, मंगेश रोकडे, रोहित शिंदे, अंकुश सावंत, अमोल बांदल, सुधाकर जिडगेकर असे सहा पोलिस जखमी झाले. सर्वांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.

आयशर चालक पळून गेला
अपघाताचे वृत्त कळताच पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर व त्यांचे पथक घटनास्थळी आले. अपघातग्रस्त वाहने बाजूला केली आणि वाहतूक सुरळीत केली. तसेच इतर पोलिस अधिकारी, कर्मचारी यांनीही घटनास्थळी आले. अपघातानंतर आयशर टेम्पोचालक पळून गेला आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हा अपघात साधारणपणे मध्यरात्री बाराच्या सुमाराला झाला आहे. पहाटे तीनच्या सुमाराला या अपघाताची फिर्याद देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...