आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:बनावट नाव वापरून पालिकेत नोकरी केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा

सोलापूर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेत बनावट नाव वापरून व खोटी कागदपत्रे सादर करून नोकरी केल्याप्रकरणी लक्ष्मण सोमय्या भंडारे उर्फ व्यंकटेश लक्ष्मण भंडारे (रा. उत्तर सदर बझार, गुलजार तालीमजवळ सोलापूर) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. महापालिका शासकीय विभागातील लिपिक राहुल कांबळे यांनी मंगळवारी रात्री सदर बझार पोलिसात दिली आहे. २२ डिसेंबर २००८ पासून ते आजपर्यंत भंडारे यांनी काम केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

भंडारे यांनी सोलापूर महानगरपालिका प्रशासनाची दिशाभूल करून नरसप्पा लक्ष्मण भंडारे याच्या जागी खोटी कागदपत्रे सादर करून नोकरी केल्याचे समोर आले आहे. याबाबत मनपा सहायक आयुक्त पुष्पगंधा भगत यांनी हे प्रकरण सदर बजार पोलिस ठाण्यात चौकशीला पाठवले होते. त्यानुसार राहुल कांबळे यांनी फिर्याद दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...