आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:उपचारात हयगय केल्याने डॉक्टरवर तब्बल चार वर्षांनी गुन्हा दाखल

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एका पंधरा वर्षीय मुलावर उपचार करताना निष्काळजीपणा केल्यावरून राज्य कामगार विमा हॉस्पिटल येथील डॉ. ए. ए. कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हवालदार प्रदीप कदम यांनी सलगर वस्ती पोलिसात २० डिसेंबर रोजी फिर्याद दिली आहे. हेमंत सुभाष सावंत (रा. विजापूर नाका झोपडपट्टी नंबर दोन) असे मृत मुलाचे नाव आहे.

१९ ते २० मे २०१८ या कालावधीत कामगार विमा हॉस्पिटल होटगी रोड येथे हा प्रकार घडला. पेशंट हेमंत सावंत याची प्रकृती अत्यवस्थ होती. त्याला सुसज्ज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची सूचना करणे आवश्यक होते. पण तसे केले नाही. उपचारात निष्काळजीपणा केला. चांगल्या दर्जाचे उपचार देण्यासाठी हालचाल केली नाही, या कारणावरून तक्रार देण्यात आली होती. चौकशी अर्जावरून हा गुन्हा दाखल झाला आहे‌. तसेच, या घटनेचा तपास आता सदर बझार पोलिस करणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...