आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनयभंगाचा गुन्हा:स्टेटसला तरुणीचा फोटो, लव्ह चिन्ह ठेवणाऱ्यावर गुन्हा दाखल; पीडितेची पोलिसांकडे तक्रार

प्रतिनिधी । बार्शी19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोशल मीडियावर स्टेटसला एका महाविद्यालयीन युवतीचे छायाचित्र व त्याखाली लव्हचे चिन्ह तिच्या परस्पर ठेवून तिची बदनामी होईल, असे कृत्य केल्याप्रकरणी एकावर बार्शी शहर पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. माधव दत्तात्रय पाटी

ल (रा. उपळाई रोड, बार्शी) असे संशयिताचे नाव आहे. याबाबत पीडित युवतीने फिर्याद दिली आहे.सदरची युवती शिक्षण घेत आहे. ती सुटीला बार्शी येथे आल्यानंतर माधव हा नेहमी तिचा पाठलाग करत असे. मला तू बोलत जा, असे म्हणाल्यानंतर युवतीने बोलण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्याने त्याचे हातावर ब्लेड मारून घेतले होते. त्यानंतर युवती शिक्षणासाठी शहरात गेली. त्यानंतर त्यांचा काही संपर्क आला नाही. काही काळानंतर माधवने युवतीचा मोबाइल नंबर मिळवून तिला त्रास देण्यास सुरूवात केली. दि. ७ मे रोजी पीडित युवतीच्या नातेवाइकाने तिच्या वडिलांना माधवने त्यांच्या मुलीचा फोटो स्टेटसला ठेवून त्या खाली लव्हचे चिन्हे ठेवले असल्याचे सांगितले. त्यानंतर पीडित युवतीने पोलिसांत फिर्याद दिली.