आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:पती-पत्नी संबंधाचा व्हिडिओ बनवून दमदाटी; गुन्हा दाखल

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील एका वस्तीमध्ये पती-पत्नी त्यांच्या राहत्या घरी रात्री संबंध ठेवत असताना एका तरुणाने त्याचा व्हिडिओ बनवला आणि नंतर त्याने दमदाटी केली, अशी तक्रार त्या पती-पत्नीने फौजदार चावडी पोलिस ठाण्यात दाखल केली. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करणे सुरू होते.१५ रोजी मध्यरात्री ही घटना घडली. सुरेश कांबळे या तरुणाने व्हिडिओ रेकॉर्ड केला.

हे करून तो पळून जात होता तेवढ्यात पती व पत्नीने त्याला पाहिले. तेव्हा पती, भाऊ, आई, वडील हे त्याच्या घरी गेले. तेव्हा त्याच्या आई - वडिलांनी सुरेश कांबळे हा बाहेर गेला आहे असे सांगितले. यानंतर त्यांनी सुरेशला मोबाइलवर संपर्क केला. त्यावर सुरेश याने त्यांना दमदाटी केली. याबाबत पती व पत्नी यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनंतर फिर्याद दाखल करण्यात आली. यावरून सुरेश कांबळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...