आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपास:येड्रावला कोयत्याने मारहाण, जखमी केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

मंगळवेढाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

घरासमोरून चालत जात असताना मोटरसायकलवर येऊन कट का मारला? जाब विचारल्याच्या कारणावरून कोयत्याने मारून जखमी केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. कुमार बजरंग राक्षे, सुशांत मारुती वाघमारे, मारुती वाघमारे (सर्व रा. येड्राव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. फिर्याद अशिष संभाजी काळे (रा. येड्राव) यांनी दिली आहे. ही घटना १ जाने २०२३ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अधिक तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय येलपले करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...