आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोलापूर:रुग्णालयात येणाऱ्या रुग्णाच्या मोबाईल आणि गाड्यांचे नंबर तोंडपाठ ठेवणारा कंपाउंडर, माढ्याच्या शंभु पोरे यांच्या स्मरणशक्तीची वाहवा

संदीप शिंदे | माढा7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

"काय द्याचं बोला" हा मराठी चित्रपट आपण नक्कीच पाहिला असेल. पेट्रोल पंपाच्या शेजारी पंक्चरच्या व्यापाऱ्याचे दुकान असते. या बन्नी नावाचे व्यापाऱ्याच्या दुकानात येणाऱ्या ग्राहकांच्या गाड्यांचे नंबर पाठ असलेले आपण पाहिले असतील. हीच कला अवगत असणारा "बन्नी" माढ्यात आहे.

शहरातील डॉ शहा हॉस्पिटल मध्ये परिचारक (कंपाऊंडर) म्हणुन काम करीत असलेले शंभु नारायण पोरे(वय-54) असे त्याचे नाव. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना ते चेहर्‍यावरुन नव्हे तर गाडीच्या नंबर वरुन ओळखतात. रुग्णाचे मोबाईल नंबर देखील तोंडपाठ आहेत. पोरे यांची स्मरणशक्ती पाहुन रुग्ण अचंबित होऊन त्यांची वाहवा केल्याशिवाय राहत नाहीत.

माढयातील बाजार तळ परिसरात रहिवासी असलेल्या शंभुचे 5 वी पर्यंतचे शिक्षण झाले. डॉ.विनोद शहा यांच्या हॉस्पिटलमध्ये परिचारक म्हणुन वयाच्या 17 व्या वर्षी ते लागले. गेल्या 37 वर्षापासुन ते या रुग्णालयात रुग्ण सेवा करताहेत. रुग्णालयात उपचारासाठी एखादा रुग्ण नव्याने आला तर त्यांचा गाडी व मोबाईल क्रमांक विचारायला शंभु विसरत नाहीत. शिवाय त्यांची रुग्णालयाच्या इमारतीवरून कोणती गाडी आहे हे देखील पाहतात.

रुग्णालयात रुग्ण येताच शंभु हे गाडीच्या नंबरवरुनच त्याचा नंबर लिहितात. आणि नंबर येताच गाडीचा नंबर घेऊनच रुग्णाच्या नावाची उद्घघोषणा करतात. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या गाड्यांचे नंबर तोंडपाठ असलेले आणि गाड्यावरुनच रुग्णांना ओळखण्याचे तंत्र वापरणाऱ्या शंभुची स्मरणशक्ती निश्चितच कौतुकास पात्र आहे.

जुन्या गाडीचे आहेत नंबर पाठ

शंभु यांना रुग्णांच्या जुन्या गाडीचे नंबर देखील तोंडपाठ आहेत. अनेकांना जुन्या गाड्या विकल्यानंतर नंबर देखील आठवत नाहीत. अशात शंभु याचे मात्र रुग्णांच्या जुन्या गाड्यांचे नंबर खटाखट पाठ आहेत.

पोरेची स्मरण शक्ति पाहुन अचंबित झालो - डॉ. विनोद शहा

गेल्या 37 वर्षापासुन शंभु माझ्या रुग्णालयात परिचारक म्हणुन काम करतोय. अतिशय प्रामाणिक आणि रुग्ण सेवेत नेहमीच तत्परता दाखवतो. माझ्या तर गाड्यांचे नंबर सगळे पाठ तर आहेतच. शिवाय रुग्णाच्या गाड्याचे नंबर व मोबाईल नंबर पाठ असलेले पाहुन अचंबित झालो. त्याची स्मरण शक्ति अफाट आहे - डॉ विनोद शहा, शहा हॉस्पिटल माढा

रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णांशी हितगुज साधण्याचा (मनमोकळे बोलणे) मला छंद जडलेला. रुग्ण सेवा देण्याबरोबर रुग्णांच्या गाडीचे नंबर व मोबाईल क्रमांक पाठ करण्याच्या छंदात अडकलो. गाडीच्या नंबरची बेरीज करुन मी तो क्रमांक लक्षात ठेवतो. आणि रुग्ण आला की त्याचा क्रमांक सांगतो. हे तंत्र मी अवगत केले. जुन्या सोबतच नव्या गाडीचे नंबर सांगणे माझ्यासाठी कठीण बाब नाही. - शंभु पोरे, कंपाऊंडर शहा हाॅस्पिटल माढा

शंभु यांची कला कौतुकास्पद - श्रीकांत काशिद, रुग्ण माढा

आज मी रुग्णालयात प्रवेश करताच शंभु हे गाडीचा क्रमांक सांगुन स्वागत केले. अनेकांना आपण वापरत असलेल्या गाडीचे क्रमांक आठवत नाहीत. कमी शिक्षण होऊन देखील स्मरणशक्तीच्या जोरावर शंभु यांना ही कला अवगत असुन ती कौतुकास्पद आहे.

अल्पशिक्षीत शंभुची स्मरणशक्ती सर्वाना अचंबित करणारी - संतोष उडगे (शासकीय कर्मचारी, रुग्ण)

माझ्या नवीन गाड्याचे नंबर पाठ तर आहेतच. शिवाय मी विकलेल्या जुन्या गाडीचे नंबर देखील शंभुचे बिनचूक पाठ आहेत. अल्पशिक्षीत असलेल्या शंभुची स्मरणशक्ती सर्वाना अचंबित करणारी आहे.

बातम्या आणखी आहेत...