आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Solapur
  • A Couple Earning Rs 1 Lakh A Month Quit Their Job And Started A Poultry Business In The Village, Earning A Profit Of Rs 2 Lakh 52 Thousand In 60 Days.

पॉझिटिव्ह बातमी:महिन्याकाठी 1 लाख रुपये कमवणाऱ्या दांपत्याने नोकरी सोडून गावात सुरू केला पोल्ट्री व्यवसाय, 60 दिवसांत मिळवला 2 लाख 54 हजारांचा नफा

माढा (सोलापूर)9 महिन्यांपूर्वीलेखक: संदीप शिंदे
  • कॉपी लिंक

पुण्यात सिव्हील इंजिनियरची नोकरी करत असलेल्या भुषण आणि स्वप्ना सिरसट या दांपत्याने नोकरीचा मार्ग सोडुन केवड गावी शेतीपूरक पोल्ट्रीचा व्यवसाय सुरू केला. हा व्यवसाय सिरसट दांपत्याला नफा देणारा ठरला आहे. गेल्या पाच महिन्यांपासून ते हा व्यवसाय करता आहेत आणि मागील 60 दिवसांत त्यांनी 2 लाख 54 हजारांचा निव्वळ नफा देखील कमवला आहे.

विवाह गाठ बांधल्यानंतर सिरसाट दांपत्य पुण्यातील येरवडा भागात असलेल्या कंपनीत सिव्हील इंजिनिअर म्हणुन कार्यरत होते. दोघांना महिन्याकाठी एक लाख रुपयाची पगार मिळायची. दरम्यान, कोरोना लॉकडाऊन जाहीर झाला आणि दोघेही पुण्यातील कंपनीमधून केवड या गावी आले.

लॉकडाऊनमुळे गावातच बसुन राहिलेल्या दांपत्याने आता कायमची नोकरी सोडुन शेतीपूरक पोल्ट्री व्यवसाय करण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांनी सुरुवातीला घराच्या परिसरातच 200 कोंबड्या आणून पोल्ट्री सुरू केली. त्यानंतर केवड गावातील शिवारात वडिलोपार्जित एक एकर शेतीत 32×60 चे पत्राचे शेड उभारून 3 हजार देशी कोंबड्या आणल्या. या कोंबड्यांसाठी त्यांना 60 दिवसांत एकुण 4 लाख 64 हजार इतका खर्च त्यांना आला. खर्च जाता अवघ्या दोन महिन्यात त्यांनी 2 लाख 54 हजारांचा नफा मिळाला. भुषण यांच्या व्यवसायात त्यांची आई शाहूबाई, वडील पांडुरंग यांचीही साथ लाभली.

आतापर्यंत हाती आलेले यश पाहता, सिरसाट दांपत्याने यापेक्षाही मोठ्या प्रमाणात व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे अनेक तरुण-तरुणी नोकरीसाठी धडपडत आहेत. तर, दुसरीकडे शेतीतील नुकसानीला अन् समस्येला कंटाळून जीवन संपवत आहेत. पण, मेहनत,जिद्द आणि त्याला कल्पकतेची जोड दिल्यास शेतीच्या जोडधंद्यातून चांगल उत्पन्न तर मिळतच, शिवाय ही समाधानही मिळत. फक्त पैशासाठी जॉब करणार्‍या आणि लग्नानंतर करियर संपलं असा समज असणाऱ्या तरुणाईला शिरसाट यांनी वेगळी वाट दाखवली असुन ही यशोगाथा आजच्या तरुणाईला प्रेरणादायी ठरणारी अशीच आहे.

यशानंतर 10 हजार कोंबड्याचे पालन-

सिरसट दांपत्याला कुक्कुटपालन व्यवसायातून मिळालेल्या यशानंतर आताच्या घडीला त्यांनी दहा हजार देशी कोंबड्याचे पालन सुरू केले असुन त्यासाठी 30×150 आकाराचे शेड उभारले आहे. सिरसट दांपत्याची यशोगाथा ऐकल्यानंतर परिसरातील तरुणाई प्रकल्प पाहण्यासाठी आवर्जुन हजेरी लावत आहेत.

पुण्यातील कंपनीत सिव्हील इंजिनिअर म्हणुन मी आणी माझी पत्नी काम करत होता. कोरोना लॉकडाऊनमुळे मात्र आम्हाला जीवनाचा नवा मार्ग मिळाला. नोकरीच्या मागे न धावता आजच्या तरुणाईने शेती पुरी व्यवसाय करणे गरजेचे आहे. 1 लाख देशी कोंबड्याचे पालन करण्याचे माझे नियोजन सुरू आहे. मला या व्यवसायाने भरघोस उत्पन्न मिळवुन दिले आहे.- भुषण सिरसट,केवड

पतीने व्यवसाय सुरु करण्याचा मांडलेले विचार मला आवडला. गावापासून दूर राहुन ठरावीक पैसे मिळण्यापेक्षा शेतीपूरक व्यवसायातून समृध्दी कशी मिळते, ते आम्हाला समजले. आजची तरुणाई नोकरीसाठी धडपडत आहे. त्यासाठी वशिला लावत पैसे देखील देतात. दुसरीकडे चाकर म्हणुन राहण्यापेक्षा स्वतःहा मालक होण्याचे स्वप्न बाळगायला हवे.-स्वप्ना सिरसट,केवड

बातम्या आणखी आहेत...