आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गो सेवकांची कामगिरी:दोन दिवसापासून संरक्षक भिंतीच्या ​​​​​​ खोबणीत अडकलेल्या गाईची सुखरूप सुटका

सोलापूर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संरक्षक भिंतीच्या खोबणीत ​​​​​​ गेल्या दोन दिवसांपासून ​अडकलेल्या गायीची सोलापुरातील गो सेवकांनी शनिवारी सायंकाळी सुटका केली. पाइपद्वारे तोंडावर पाण्याचा फवारा मारत, गाईला मागे सरकण्यास भाग पाडले. दीड तासाच्या धडपडीनंतर गाय सुखरूप बाहेर पडली. खोबणीतून बाहेर येताच त्या गायीने क्षणार्धात धूम ठोकली. यावेळी गो सेवकांनी टाळ्या वाजवत आनंद व्यक्त केला.

सोलापूर अक्कलकोट रस्त्यावरील शहरालगतच्या मुस्लिम कब्रस्तान जवळील खड्ड्यात एक गाय चरत होती. नुकत्याच झालेल्या पावसाने त्या भागात गवत वाढले आहे. गाय गवत चरण्याच्या नादात पुढे सरकत गेली आणि संरक्षक भिंत व रस्त्यालगतचा पुलाचा कठडा अशा खोबणीत ती अडकली. पुढे जाण्यासाठी रस्ता नव्हता व वळण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने एकाच ठिकाणी ती अडकली.

सुखरूप बाहेर काढले

रस्त्यावरून जाणाऱ्या एका प्रवाशाला वाटसरूला गाय खोबणीत अडकल्याचे लक्षात आले. त्यांनी गोसेवक गोपाळ सोमानी यांना घटनेची माहिती दिली. यानंतर सेवकांचे पथक घटनास्थळी आले. त्यांनी गाईला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. दावे बांधून गाईला मागे ढकलत त्या खोबणीतून सुखरूप बाहेर काढले.

बातम्या आणखी आहेत...