आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकरावी प्रवेश:ए. डी. जोशी 89, संगमेश्वर व दयानंद 88 तर हरिभाई 86 टक्केला क्लोज

सोलापूर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकरावी प्रवेशाच्या गुणवत्ता याद्या शुक्रवारी दुपारी महाविद्यालय स्तरावर जाहीर झाल्या. मागील वर्षापेक्षा कट ऑफ कमी लागला आहे. यंदाच्या वर्षी मुलांना टक्केवारी जास्त मिळाली असल्याने कट ऑफ वाढेल असे अपेक्षित होते. परंतु विज्ञानाचा कट ऑफ ८९ ते ८६ टक्केच्या दरम्यान लागला आहे. संगमेश्वरमध्ये विज्ञान शाखेचा कट ऑफ खुला ८८ टक्के, ए.डी.जोशी ८९, दयानंद ८८.८, हरिभाई देवकरण ८६.४ टक्केवर बंद झाला आहे. नामवंत महाविद्यालयांतही कला शाखेला येईल त्यास प्रवेश मिळणार आहे. केंद्रीय बोर्डाचा निकाल प्रलंबित असल्याने अकरावी प्रक्रिया वेळेत हाेऊ शकली नाही. कॉमर्स शाखेकडेही गुणवंताचा ओढा आहे. संगमेश्वर ६८, दयानंद येथे ७७ टक्केला कॉमर्स यादी क्लोज झाली. वालचंद विज्ञान अनुदानित जैन अल्पसंख्याक ६०.४ टक्के, इतर ८७.६ टक्केला बंद झाली आहे. वालचंद विनाअनुदानित जैन अल्पसंख्याक ६४.२ टक्के तर इतर ८६.६ टक्केला क्लोज झाली आहे.

विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही, योग्य खबरदारी घेऊ परीक्षेतील चुकांचा परिणाम विद्यार्थ्यांवर होणार नाही. यातून मार्ग काढून विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होऊ नये याची आम्ही खबरदारी घेत आहोत. विद्यार्थ्यांना जितके काही चांगले देता येईल, ते देण्याच्या आमचा प्रयत्न आहे. डॉ. मृणालिनी फडणवीस, कुलगुरू

बातम्या आणखी आहेत...