आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौकशी:सिव्हिलसमोरील कचराकुंडीमध्ये पुरुष जातीचे मृत अर्भक सापडले

सोलापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर शासकीय रुग्णालयासमोरील एका कचराकुंडीत पुरुष जातीचे अर्भक (एक दिवस) मृतावस्थेत पोलिसांना सापडले. मंगळवारी सकाळी नऊच्या सुमाराला हा प्रकार समोर आला. कचरा साफ करणाऱ्या एका व्यक्तीला प्लास्टिक व कापडात गुंडाळेले हे एक दिवसांचे बाळ सापडले.जेल रोड पोलिसांना माहिती दिल्यानंतर ते घटनास्थळी आले आणि मृतदेह ताब्यात घेतला. तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.‌ हे बाळ कोणाचे आहे, कशासाठी टाकले याचा शोध सुरू आहे. याप्रकरणी मृत बाळाची प्राथमिक नोंद सिव्हिल पोलिस चौकीत आहे.

शवविच्छेदन अहवालानंतर आणि चौकशीत नेमके या घटनेचे कारण समोर येईल असे सांगण्यात आले. सापडलेले बाळ कोणाचे आहे, याचा शोध‌ पोलिसांनी सुरू केला आहे. शासकीय रुग्णालयात मागील २४ तासांत कोणी बांळत झाले आहेत, कोणाचे बाळ मृत पावले आहे का? याची माहिती घेऊन पोलिस त्या दृष्टीने तपास करत आहेत. मागील २४ तासांत तीन अर्भकांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांकडे आहे. त्यापैकी कोणी टाकले आहे का याचीही खातरजजमा पोलिस करत आहेत. इतर शक्यता गृहीत धरून तपास सुरू असल्याचे जेलरोड ठाण्याचे निरीक्षक जाफर मोगल यांनी सांगितले.

सिव्हिलमध्ये चौकशी
मागील २४ तासांत २३ महिला बाळांत झाल्या आहेत. त्यातील नातेपुते आणि पंढरपूर परिसरातील दोघींना सोलापूर शासकीय रुग्णालयात रेफर केले होते. त्याबद्दल अधिक माहिती घेणे सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...