आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामार्गशीर्ष शुद्ध एकादशी आणि या महिन्यातील दुसरा रविवार असल्याने लाखो वारकऱ्यांची विष्णुपद येथे गर्दी उसळली होती. हजारो पंढरपूरकर आणि लाखांवर वैष्णवांनी विष्णूच्या पदचिन्हाचे दर्शन घेतले. वनभोजनाचा आस्वादही घेतला.संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यात शहरातील नागरिक सहकुटुंब विष्णुपदाचे दर्शन घेतात. मंदिर समितीने सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहेत. एकादशीच्या दिवशी गर्दी लक्षात घेऊन शहर पोलिस निरीक्षक अरुण फुगे हे स्वतः िवष्णुपद येथे बंदोबस्तावर होते.
पंढरपूर शहरात श्री विठ्ठल दर्शनासाठी लाखो वारकऱ्यांची गर्दी झाली होती. दर्शन रांगेत २५ हजारांहून अधिक वारकरी उभे होते. दर्शनरांग पत्राशेडपर्यंत पोहोचली होती. एकादशी आणि रविवार असल्याने हजारो पंढरपूरकरांनीही विष्णुपद येथे गर्दी केली होती. हजारो भाविक पुंडलिक मंदिरापासूनच चंद्रभागा नदीतून नौकाविहार करीत विष्णूपद येथे येत होते. भाविकांनी या ठिकाणी नदीपात्रात नौका विहाराचाही आनंद घेतला.
मार्गशीर्षमध्ये विठ्ठलच वास्तव्यास प्रत्येक वर्षी मार्गशीर्ष महिन्यात श्री विठ्ठल हा गोपाळपूर येथील विष्णुपद येथे वास्तव्यास असतो. तो गोपाळांच्या गायी राखतो. त्यांच्यासोबतच वनभोजन करतो, अशी आख्यायिका असल्याने मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला आलेले वारकरी श्री विठ्ठलाच्या भेटीसाठी गोपाळपूर येथील विष्णुपद येथे जमतात. येथे चंद्रभागा नदीच्या मध्यभागी असलेल्या श्री भगवान विष्णूच्या पदचिन्हांचे दर्शन घेतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.