आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छान किती दिसते फुलपाखरू!:देशातील सर्वात मोठे सदर्न बर्डविंग फुलपाखरू कोल्हापुरात आढळले, पर्यटकांची झुंबड

सोलापूर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छान किती दिसते फुलपाखरू, हे गाणं सध्या कोल्हापुरातील राधानगरी उद्यानात येणारा प्रत्येक पर्यटक गुणगणत आहे. त्याच कारणही तसंच आहे. या उद्यानात देशातील सर्वांत मोठे सदर्न बर्डविंग या प्रजातीचे फुलपाखरू आढळले आहे. फुलझाडी, वेलींवर भिरभिरणारे हे फुलपाखरू पर्यटकांचे आकर्षण केंद्र ठरत आहे.

काळसर सोनेरी, पिवळा रंग

सदर्न बर्डविंग या फुलपाखराचा आकार आकार 140 ते 190 मिलिमीटर आहे. काळसर तसेच सोनेरी पिवळ्या रंगाचे हे फुलपाखरू आहे. ते उद्यानात आढळल्याने पर्यावरणप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे. राधानगरी तालुका समृद्ध जैवविविधतेने नटलेला आहे. जागतिक वारसा स्थळ असलेले दाजीपूर अभयारण्य हे गव्यांसाठी प्रसिद्ध आहे. आता ते विविध फुलपाखरांसाठीही प्रसिद्ध होऊ लागले आहे. याच परिसरात काजवा महोत्सवही मोठ्या स्वरूपात होतो.

उद्यानात 55 प्रजातींची फुलपाखरे

राज्यातील पहिले फुलपाखरू महोत्सव डिसेंबर 2015 मध्ये राधानगरीमध्ये घेण्यात आले होते. पर्यावरण अभ्यासक सुहास वायंगणकर यांच्या पुढाकारामुळे येथे फुलपाखरू उद्यानाची निर्मिती झाली आहे. राधानगरी परिसरात 55 प्रजातींची फुलपाखरे आढळतात, दाजीपूर परिसरात 130 पेक्षाही अधिक प्रजातींचे फुलपाखरू दिसतात. बायसन नेचर क्लबचे सम्राट केरकर म्हणाले, समृद्ध जैवविविधतेने नटलेला राधानगरी तालुका पर्यटनाचे त्यांचे केंद्रबिंदू ठरला आहे. वन्यजीव, संरक्षण व संवर्धन, चांगल्या पर्यटन सविधांमुळे या परिसराचा सर्वांगीण विकास होत आहे.

---

बातम्या आणखी आहेत...