आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंडे पॉजिटिव्ह:हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी चार वर्षांची बालिका हेलिकॉप्टरमधून मुंबईला

सोलापूर7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आमदार प्रणिती शिंदे यांच्या विनंतीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी आलेल्या हेलिकॉप्टरने मुलीस पाठवले

हृदयावर शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी चार वर्षांच्या बालिकेला हेलिकॉप्टरने मुंबईला नेण्यात आले. मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये तिच्यावर रविवारीच शस्त्रक्रिया होणार होती. आमदार प्रणिती शिंदे यांच्या विनंतीवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी आलेल्या हेलिकॉप्टरमधून उंजल तुकाराम दासी (वय ४) हिला पाठवले आणि स्वत: रेल्वेगाडीने जाण्याचा निर्णय घेतला.

उंजलच्या हृदयाला जन्मत:च छिद्र आहे. शहरातील हृदयरोग तज्ञांनी तिच्यावर शस्त्रक्रिया होणे गरजेचे असल्याचे सांगितले. तिचे वडील तुकाराम दासी (रा. सुनीलनगर, एमआयडीसी सोलापूर) हे एका खासगी हॉस्पिटलमध्ये ऑपरेटर म्हणून काम करतात. घरची परिस्थिती हलाखीची, लाखोंचा खर्च परवडणारा नव्हता. आर्थिक विवंचनेत असताना त्यांनी आमदार शिंदे यांची भेट घेतली. सर्व हकीकत सांगितली, आमदार शिंदे यांच्या प्रयत्नातून मुंबईतील रिलाइन्स हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यासाठी उंजलला पाठवण्याचे नियोजन केले आहे. उंजल तुकाराम दासी हिच्या हृदयाची शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे. शस्त्रक्रिया लवकरात लवकर करण्यात यावी, अशी मागणी केली होती.

बातम्या आणखी आहेत...