आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्घटना:दोन कारचा विचित्र अपघात; दोन्हीचे चालक ठार; 4 जखमी

मोहोळ/ सोलापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्याहून सोलापूरकडे निघालेल्या कारचे टायर फुटून दुसऱ्या कारला धडकल्याने दोघे चालक ठार तर चार जखमी झाले. निखिल बिराजदार (अक्कलकोट) व शशिकांत अधटराव (माकणी, जि. उस्मानाबाद) अशी मृतांची नावे आहेत. मोहोळ सोलापूर मार्गावर कोळेगावजवळ शनिवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास हा अपघात झाला. सोलापूरकडे निघालेली कार टायर फुटल्याने रस्ता दुभाजक पार करून विरुद्ध दिशेच्या मार्गावर आली. त्यात सोलापूरहून पुण्याकडे निघालेल्या कारला धडकून अपघात झाला.

पुण्याहून सोलापूरकडे निघालेली कार (एमएच १२ ०८६७) कोळेगाव हद्दीतील वर्धमान फर्टिलायझर जवळ आली असता टायर फुटले. वेगाने गाडी रस्ता दुभाजक तोडून विरुद्ध दिशेने सोलापूरहून पुण्याकडे निघालेली कार (एमएच २५, आर ०८६५) ला धडकली. या विचित्र अपघातात शशिकांत सदाशिव अधटराव (वय ४२, रा. माकणी, ता. लोहारा जि. उस्मानाबाद) व निखिल शशिकांत बिराजदार (वय ४० रा. अक्कलकोट जि. सोलापूर) हे दोघेही चालक ठार झाले.

ओवी निखिल बिराजदार (वय ८), अनुराधा रविकांत बिराजदार दोघी (रा. अक्कलकोट), सुनीता शशिकांत अधटराव व बालाजी काशिनाथ साठे (दोघे रा. माकणी ता. लोहारा, जि. उस्मानाबाद) असे चार जण जखमी झाले आहेत. जखमींवर सोलापूर येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सिव्हिल पोलिस चौकीत या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. तपास अपघात पथकाचे सहायक पोलिस फौजदार ज्योतिबा पवार करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...