आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहर पोलिसांनी चोरांची टोळी उघडकीस आणली असून तीन संशयितांकडून १०० ग्रॅम सोने, १० ग्रॅम चांदी व घरफोडीत वापरलेली कार असा एकूण ११ लाख ८५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.चंद्रकांत ऊर्फ चंंदू अनंत माने (वय ३० वर्ष, रा. अजंठा नगर, पिंपरी चिंचवड, पुणे), राहुल हिरामण लष्करे (वय २२ वर्ष रा. वाकड, पुणे) व गौरव कुंडलिक घुमरे (वय ३३ वर्ष, रा. शिवशक्ती चौक, सिडको, नाशिक) अशी त्यांची नावे आहे. यातील माने सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर रायगड व सोलापूर या जिल्ह्यात घरफोडी व चोरीचे ५० पेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
२९ नोव्हेंबर रोजी चंदू माने हा नंबर प्लेट नसलेल्या कारमध्ये पूर्व भाग चौपाटी ते कर्णिक नगर या रोडवर थांबल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय क्षीरसागर यांच्या पथकास आढळले. त्यांनी चाैकशी केेली असता त्याने साथीदारांसह विजापूर नाका व जोडभावी पेठ पोलिस स्टेशन येथे घरफोडी, चोऱ्या केल्याचे कबूल केले. पोलिस पथकात महेश शिंदे, राजू मुदगल, कृष्णात कोळी, कुमार शेळके, महेंद्र ठोकळ, सिध्दाराम देशमुख, वसिम शेख, प्रवीण शेळकंदे यांचा समावेश होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.