आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासदायक!:अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात; राज्यशासनातर्फे 40 कोटी 53 लाखांची मदत

सोलापूर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे जून ते ऑगस्ट दरम्यान शेती-पिक व शेतजमिनीच्या नुकसानी करता राज्यशासनाने वाढीव दराने तब्बल तीन हजार पाचशे एक कोटी एकाहत्तर लाख 21 हजार रुपये मदत मंजूर करण्यात आली.

सोलापूर जिल्ह्यात 40 कोटी 53 लाख 49 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, त्यासंदर्भातील आदेश उपसचिव संजय धारुरकर यांच्या स्वाक्षरीने निघाला आहे. सोलापूरसह, राज्यभरात जुन ते ऑगस्ट दरम्यान सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. काही जिल्ह्यांमध्ये ढगफुटी झाल्याने खरीप हंगामातील उडीद, सोयाबीन, कापूस, तूर, मूग, मटकी आदी पिकांचे मोठे नुकसान झाले.

दरम्यान, अनेक नद्यांना आलेल्या पुरामुळे राज्यातील 325 गावातील 23 हजार 683 हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. त्यापैकी 10 हजार 894 हेक्टर क्षेत्रातील शेतजमिनी खरडून, वाहून गेल्यामुळे बाधित झाले. तर, 12 हजार 788 हेक्टर क्षेत्रातील शेतजमिनीवर तीन इंचांपेक्षा अधिक जाडीचा गाळ साचले होते. पुरामुळे सर्वाधिक नुकसान नागपूर विभागातील जिल्ह्यांमधील शेतजमिनींचे झाले होते.

जुलै व ऑगस्ट महिन्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. 65 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झालेल्या मंडलातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. राज्यातील 27 लाख 65 हजार 727 शेतकऱ्यांचे 23 लाख 81 हजार 120 हेक्टरवर क्षेत्रावरील पिकं बाधित झाली आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, अक्कलकोट, उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर तालुक्यातील 28 हजार 66 शेतकऱ्यांचे 25 हजार 999.30 हेक्टर पिके बाधित झाली आहेत. जिल्हा प्रशासनाने 29 ऑगस्टला राज्य शासनाकडे 40 कोटी 53 लाख 49 हजार रुपयांचा सादर केलेला मदत निधीचा प्रस्ताव शासनाने स्विकारला आहे.

जिल्ह्यात ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टी होऊन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामध्ये बार्शी, अक्कलकोट व उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. या तालुक्यात अतिवृष्टी व पुरामुळे सोयाबिन, तूर, मूग, उडिद यासह बागायती व फळ पिकांचेही नुकसान झाले होते. या चार तालुक्यातील पंचनामे पूर्ण झाले आहेत. मदतीसाठी 40 कोटी 53 लाख 49 हजार 780 रुपयांचा प्रस्ताव सादर केला होता.

बातम्या आणखी आहेत...