आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअवैध पद्धतीने तोडलेल्या झाडांच्या लाकडाची वाहतूक करणारी जीप जप्त करून चालकाच्या विरुद्ध वन विभागाने गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी (दि. २९) दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी परिसरातील कर्देहळ्ळी ते शिर्पनहळ्ळी रस्त्याच्या दुतर्फा असेलेली २० हून अधिक कडूनिंबाची झाडे अवैध मार्गाने तोडली होती. वन विभागाची कोणतीही परवानगी घेतली नव्हती.
वृक्षतोडीचे सचित्र वृत्त दिव्य मराठीमध्ये प्रसिद्ध झाले होते. वनपरिक्षेत्र अधिकारी दीपक खलाणे यांनी चौकशीसाठी वनपाल सावंत, वनरक्षक अनिता शिंदे यांना घटनास्थळी पाठवले होते. जीप (एमएच १३ एफ ९४९८) वळसंग परिसरातून जप्त केली. तसेच, चालक अशोक रामचंद्र गुरव (वय ३०, रा. वळसंग) यांच्याविरुद्ध वन विभागाने अवैध वृक्षतोड प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
शिर्पनहळ्ळी रस्त्यावरील अवैध वृक्षतोड प्रकरण
कडूनिंबाची झाडे तोडून वाहतूक केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच, लाकूड भरलेला टेम्पो जीप जप्त करून वनविभागाने ताब्यात घेतले आहे. चालक गुरव याचा जबाब नोंदवण्यात येत आहे. त्यानुसार पुढील कारवाई होईल. ''- श्री. सावंत, वनपाल, दक्षिण सोलापूर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.