आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Solapur
  • A Milestone Medical Treatment In Osmanabad | First Difficult Spine Surgery Performed In Govt Medical College | Success Of Neuro Surgeon Team

उस्मानाबादेत वैद्यकीय उपचारातील मैलाचा दगड:शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पार पडली मणक्याची पहिली अवघड शस्त्रक्रिया

उस्मानाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तातडीच्या उपचारासाठी आता उस्मानाबाद येथील रुग्णांना सोलापूर, लातूरला जाण्याची गरज पडणार नाही. उस्मानाबाद जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मणक्याची पहिली अवघड शस्त्रक्रिया पार पडली आहे. या यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल टीमचे कौतुक होत आहे.

अनेक महिन्यांपासून जिल्हा रूग्णालयातील बंद असलेल्या अस्थिरोग विभागातील शस्त्रक्रिया पुन्हा सुरू झाल्या आहेत. इम्प्लान्ट साहित्य आणि सी-आर्म मशिनअभावी जिल्हा शासकीय रूग्णालयात बंद असलेल्या हाडांची शस्त्रक्रिया सुरू करतानाच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सोमवारी (दि. 5) अत्यंत अवघड शस्त्रक्रियेचा श्रीगणेशा केला आहे.

उस्मानाबादेत वैद्यकीय तज्ञांची उणीव भासत होती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाल्यानंतर काही पदे भरण्यात आली आहेत. त्यात म्हत्वाचे पद म्हणजे न्यूरो सर्जन. काही दिवसांपूर्वीच डॉ. तृप्ती पवार या न्यूरो सर्जन या पदावर रूजू झाल्या आहेत. त्यानंतर अनेक महिन्यांपासून जिल्हा रूग्णालयातील बंद असलेला अस्थिरोग विभाग सुरू झाला.

इम्पाल्न्ट आणि सी-आर्म मशिन बंद असल्यामुळे हाडाशी संबंधित कोणत्याही शस्त्रक्रिया केल्या जात नव्हत्या. मात्र, वैद्यकीय महाविद्यालयाच्या टीमने ही मशिन दुरूस्ती करून घेतली तसेच साहित्यही मागविले. सोमवारी एका 45 वर्षांच्या रूग्णाची सर्वात अवघड मणक्याची शस्त्रक्रियाही पार पडली.

ही शस्त्रक्रिया वैद्यकीय महाविद्यालयात नव्यानेच रुजू झालेल्या न्यूरोसर्जन डॉ.तृप्ती पवार यांनी केली. यावेळी डॉ.सतीश आदटराव व डॉ. सुधीर सोनटक्के यांनी भुलतज्ञ म्हणून काम पाहिले. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.संजय राठोड तसेच रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. तानाजी लाकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया पार पडली.

तातडीच्या रूग्णांना मिळेल जीवदान

मोठ्या दुर्घटनेनंतर किंवा तातडीच्या वैद्यकीय उपचारासाठी जिल्ह्यात वैद्यकीय सुविधा अपुऱ्या होत्या. त्यामुळे रूग्णांना जिल्ह्याबाहेर जावे लागत होते. प्रवासात वेळ जात असल्याने रूग्णांचे प्राण जात होते. आता मात्र तातडीच्या सुविधा उपलब्ध होऊ लागल्याने रूग्णांना जीवनदान मिळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...