आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्कर्माची तक्रार दिल्याने घरात घुसून अल्पवयीन मुलीवर कोयत्याने हल्ला:बार्शीतील प्रकार, 2 तरुणांना अटक, पॉस्कोनुसार गुन्हा दाखल

बार्शी24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुष्कर्माची तक्रार दिल्यामुळे दोन तरुणांनी बार्शी तालुक्यातील एका गावात घरात घुसून अल्पवयीन मुलीवर सशस्त्र हल्ला करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. हल्ल्यानंतर मुलीच्या पालकांनी ६ मार्चला रात्री साडेअकरा वाजता पुन्हा पोलिसांत तक्रार दिली. बार्शी शहरात शिकवणी करून परत गावी जाताना ५ मार्चच्या रात्री साडेनऊ वाजता दोन तरुणांनी ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर दुष्कर्म केले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठला मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार बार्शी शहर पोलिस ठाण्यात अक्षय विनायक माने आणि नामदेव सिद्धेश्वर दळवी या दोन संशयित आरोपींच्या विरोधात पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच राग मनात धरून घरात घुसून मुलीवर हल्ला करण्यात आला. मुलीवर सोलापुरात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दोन्ही संशयितांना अटक केली आहे.

पोलिसांनी सांगितले, की बार्शीत बारावीत शिकत असलेल्या पीडित मुलीची परीक्षा सुरू आहे. जीवशास्त्र विषयाची शिकवणी संपल्यानंतर पीडित मुलगी ५ मार्चच्या रात्री साडेनऊच्या सुमारास आपल्या गावाकडे नेहमीप्रमाणे स्कुटीवरून निघाली होती. रस्त्यात रेल्वे गेटच्या अलीकडे बारबोले यांच्या शेताजवळ समोरून दुचाकीवर आलेल्या अक्षय माने आणि नामदेव दळवी यांनी दुचाकी आडवी लावून तिला थांबवले. बोलत का नाहीस, भेटत नाहीस, फोन का करत नाहीस असे म्हणून दोघांनी तिला बोलण्याचा आग्रह केला. तिने बोलण्यास नकार दिला. त्यानंतर अक्षय माने याने ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर दुष्कर्म केले, तर नामदेव याने त्याला सहकार्य केले. रात्री घरी गेल्यानंतर मुलीने पालकांना माहिती दिली. पीडितेच्या तक्रारीवरून दोघांवर पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला.

हल्ल्यानंतर मुलगी झाली बेशुद्ध
वैद्यकीय तपासणीसाठी पीडितेला सोमवारी आणण्याची सूचना पोलिसांनी पालकांना दिली होती. मुलीला नातेवाइकांसोबत घरी ठेवून पालक पोलिस ठाण्याकडे गेले असताना दोन्ही संशयितांनी कोयता, सत्तूर सारख्या धारधार शस्त्रांसह घरात घुसून पोलिसांत तक्रार का दिली म्हणत पीडित मुलीवर जीवघेणा हल्ला केला. त्यात तिच्या डोक्यात उजव्या बाजूस, कपाळावर डाव्या बाजूस, डाव्या हाताच्या काेपरावर, उजव्या हाताच्या बोटावर जखम झाली आहे. उजव्या हाताची दोन बोटे तुटल्याने ती बेशुध्द झाली. ग्रामस्थांच्या मदतीने रुग्णवाहिकेतून सोलापूरला नेण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक सारिका गटकूळ तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...