आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआपल्या नातेवाईका कडे कडबा घेऊन चाललेल्या पिकअप गाडीने अचानक पेट घेत त्यातील हजारो रुपयांचा कडबा व पीक अप जीप गाडी जळून खाक झाल्याची घटना मोहोळ तालुक्यात आज शुक्रवार दि.२ रोजी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास नरखेड -अनगर रस्त्यावर घडली.
तब्बल दोन ते तीन तास गाडी व गाडीतील कडबा जळतच होता. या घटनेत दोघेजण गँभीर भाजले आहेत.याबाबत समजलेली प्राथमिक माहिती अशी की वाळूज येथील ग्रामस्थ अनंता माळी हे ५०० पेंडी कडबा घेऊन आपल्या जावयाकडे चालले होते, पीक अप गाडी वाळूजहून अनगर नरखेड रस्त्यावरून माढ्याकडे जात होती. या गाडीत चालक विजयकुमार मोटे सह बाळासाहेब निंबाळकर, अनंता माळी,त्यांची पत्नी, एक लहान मुलगी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे,, त्यापैकी विजयकुमार मोटे व बाळासाहेब निंबाळकर हे दोघे जण गँभीर भाजले असून त्यांच्यावर शासकीय रूगणालया उपचार सुरू आहेत. उर्वरित उतरून पळल्याने वाचले या घटनेचे वृत्त वाऱ्या सारखे पसरले, वाळूज परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले, त्यांनी आग विझविण्यासाठी मोठी धावपळ केली मात्र ती निरूपयोगी ठरली. सध्या कडब्याचा भाव १५हजार रुपये शेकडा असा आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.