आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गैरप्रकारांवर आळा:जिल्हा दूध संघात नवीन संकलन यंत्रणा‎ कार्यान्वित; भेसळखोरांना बसेल चाप‎

उत्तर सोलापूर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या सर्व संकलन‎ केंद्रावर अद्ययावत दूध संकलन यंत्रणा बसवण्यात‎ आली आहे. त्याचबरोबर सर्व संकलन केंद्रांत‎ सीसीटीव्ही यंत्रणाही बसवण्यात आली आहे. त्यामुळे‎ दूध पंढरीमध्ये दर्जेदार दूध संकलित होण्यास मदत‎ होणार असून, गैरप्रकारांवर आळा बसणार आहे.‎ दूध संकलनातील गोंधळ कमी करण्यासाठी सोलापूर‎ जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या प्रशासनाने सर्व‎ दूध संकलन केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात‎ सुरुवात केली आहे.

संघाच्या केगाव, मंगळवेढा,‎ सांगोला, टेंभुर्णी व करमाळा येथील संकलन केंद्रावरील‎ सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. तर मोहोळ व‎ पंढरपूर येथे ही यंत्रणा बसवण्यास सुरुवात झाली आहे.‎ त्याचबरोबर केगाव येथील संकलन केंद्रावर अद्ययावत‎ दूध तपासणी प्रणाली बसवण्यात आली आहे. या‎ प्रणालीमुळे कमी प्रतीचे दूध घालणाऱ्या संस्थांना आळा‎ बसणार असून, संघाची दूध गुणप्रत सुधारण्यास मदत‎ होणार आहे, माहिती संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे‎ यांनी दिली.‎

गेल्या काही दिवसांत केगाव येथील दूध संकलनात‎ गैरप्रकार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात‎ आले. तेथे नव्याने पदासाठी पात्र तपासणीस नेमण्यात‎ आले आहेत, अशीही माहिती शिंदे यांनी या वेळी दिली.‎ जिल्हा सहकारी दूध संघात कमी प्रतीचे दूधपुरवठा करत‎ लाखो रुपयांची मलाई खाण्याचा उद्योग कित्येकांनी‎ वर्षानुवर्षे केला. संघ भाकड होण्यामागचे एक कारण‎ आहे. मात्र नवीन यंत्रणा प्रामाणिकपणे राबवल्यास हा‎ सर्व प्रकार थांबणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...