आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आनंदी उत्सवासाठी:गणेश मंडळांना परवाना देण्यासाठी आजपासून एक खिडकी योजना सुरू; ठाणेनिहाय मंडळ पदाधिकारी संवाद मोहीम

संजय जाधव | सोलापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणपती उत्सव दहा दिवसांवर आला आहे. पोलिसांनीही तयारी सुरू केली आहे. सातही पोलिस ठाणे हद्दीत प्रत्येक मंडळ व कार्यकर्त्यांशी संवाद, त्यांच्या अडचणी समजून घेणे यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. मंडळाना एकाच छताखाली परवानगी मिळावी यासाठी पोलिस आयुक्तालयात सोमवारपासून एक खिडकी योजना सुरू करणार असल्याची माहिती पोलिस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांनी दिली आहे.

मंगळवारी सर्व मध्यवर्ती मंडळ पदाधिकाऱ्यांसोबत शांतता कमिटीची बैठक होणार आहे. याशिवाय सातही पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मध्यवर्ती मंडळे, उत्सव पदाधिकारी, शांतता कमिटी सदस्य यांच्यासोबत बैठका घेण्यासाठी सहायक पोलिस आयुक्त, पोलिस निरीक्षक यांना सूचना दिल्या आहेत.एक गाव एक गणपती : सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम राबवणाऱ्या मंडळांना पोलिसांतर्फे पारितोषिके देण्यात येणार आहे. जिल्ह्यात एक गाव एक गणपती उपक्रमासाठी २५ पोलिस ठाणे अंतर्गत भर देण्यात येणार आहे. ३०० हून अधिक गावांत एक गाव एक गणपती योजना अंमलात आहे. यंदा आणखी गावांची संख्या कशी वाढेल यासाठी पोलिस उपाधीक्षक, पोलिस निरीक्षक प्रयत्न करणार आहेत.

पोलिसांच्या मुलांनी बनवल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती
कलावृंदावन चित्रशाळा आणि इको फ्रेंडली क्लब यांच्या वतीने पोलिसांच्या मुलांसाठी इको फ्रेंडली गणेशमूर्ती बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली. हा उपक्रम पोलिस मुख्यालयात झाला. मूर्तिकार आशिष माशाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मातीपासून गणपती कसे बनवायचे याचे प्रात्यक्षिक दाखवले. सर्व मुला-मुलींनी मातीपासून गणपती बनवले. बनवलेले गणपती विद्यार्थ्यांनी घरी नेले. यंदाच्या वर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प यावेळी विद्यार्थ्यांनी केला. या उपक्रमासाठी सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे, प्रीती टिपरे, निरीक्षक शिवशंकर बोंदर, पोलिस अंमलदार अमोल कानडे, बाबू मंगरूळे, प्रकाश कोरे, कलावृंदावन चित्र शाळेचे अभिषेक माशाळे, शुभम गुळसकर यांनी सहकार्य केले. इको फ्रेंडली क्लबचे परशुराम कोकणे उपस्थित होते.

पर्यावरणपूरक उत्सवासाठी मंडळांना करणार विनंती
शहरातील गणपती मंडळांनी सामाजिक उपक्रम राबवण्यावर भर द्यावा. पर्यावरणपूरक उत्सव साजरा करावा, यासाठी मंडळांना विनंती करण्यात येणार आहे.
डॉ. वैशाली कडूकर, पोलिस उपायुक्त

मंडळांना देणार बक्षिसे
जिल्ह्यामध्ये पंचवीस पोलिस ठाणे आहेत. त्याअंतर्गत उपविभागीय स्तरावर सामाजिक उपक्रम, पर्यावरणपूरक गणपती अशा मंडळांना प्रथम, द्वितीय, तृतीय असे पुरस्कार देण्यात येणार आहेत.
तेजस्वी सातपुते, पोलिस अधीक्षक ग्रामीण

बातम्या आणखी आहेत...