आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव:दुबई प्रदर्शनात सोलापूरच्या युवा कलावंताचे झळकले चित्र ; आर्ट््स क्राफ्ट गॅलरीतर्फे आयोजन

सोलापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त भारतीय दूतावास व आर्ट््स क्राफ्ट गॅलरी, दुबई यांच्या संयुक्त विद्यमाने दुबईत भारतीय चित्रकारांच्या चित्रांचे प्रदर्शन आयोजिले गेले. यात सोलापूरचे चित्रकार रामचंद्र खरटमल यांच्याही चित्राचा समावेश होता. भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे या संकल्पनेवर हे प्रदर्शन होते. चित्रकार रामचंद्र खरटमल यांचे ‘विजय दिवस’ या विषयावरील चित्र प्रदर्शनात झळकले. १९७१ भारत-पाक युद्धावर आधारित हे चित्र आहे. जे भारताच्या तीनही दलाची शौर्यगाथा सांगणारे आहे. हा आपला स्वातंत्र्य भारताचा पहिला संपूर्ण विजय होता. या घटनेेने जगात भारताची मानउंचावली. जगाला तेव्हा पहिल्यांदा दाखवून दिले, स्वतंत्र भारत काय करू शकतो ते. अशा आशयाचे चित्र भारतीय दूतावास अबू, दुबई येथे सन्मानाने प्रदर्शित झाले आहे.

खरटमलांचा अनेक प्रदर्शनात सहभाग
चित्रकार रामचंद्र खरटमल हे मूळचे सोलापूरचे आहेत. सध्या ते पुण्यात राहत असून त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक चित्रकलेतील पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. खरटमल यांचे चित्रकला क्षेत्रात अग्रगण्य नाव आहे.

बातम्या आणखी आहेत...