आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:किल्ला बाग सुशोभीकरणाचा दीड कोटीचा आराखडा नियोजन समितीकडे सादर होणार ; खासदार महास्वामी यांनी घेतलेल्या बैठकीत चर्चा

सोलापूर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील किल्ला बाग पुरातन खात्याच्या ताब्यात आहे. ही बाग पालिकेच्या ताब्यात देण्यासाठी खासदार डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. तेथील कामासाठी पालिकेने दीड कोटी रुपयांचा आराखडा तयार केला असून, जिल्हा नियोजन समितीकडे सादर करण्यात येणार आहे. पुणे ते हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर रूपाभवानी मंदिराजवळ पर्ल गार्डनच्या बाजूस पालिकेची जागा मंगल कार्यालयासाठी ३० वर्षाच्या मुदतीत भाड्याने देण्यात येणार आहे, अशी माहिती पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली. किल्ला बागेत सुशोभीकरणासाठी दीड कोटी आवश्यक आहे. त्याचा आराखडा जिल्हा नियोजन समितीकडे पाठवण्यात आला आहे. बाग पुरातन विभाग पालिकेच्या ताब्यात देण्याची तयारी दर्शविल्याने पालिकेने आराखडा तयार केला. वरवडेजवळ पालिकेची एकर जागा असून, ते वखार महामंडळाला देण्यात येणार आहे. आसरा पुलाच्या आराखड्यासाठी १८ लाख भरणार आसरा पुलाच्या कामासाठी आराखडा करण्यासाठी महापालिका १८ लाख रुपये भरणार आहे. त्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. तसेच हद्दवाढ भागातील जागेची मोजणी करण्यासाठी पहिल्या टप्प्यात ४.१८ कोटी रुपये महापालिका भरणार आहे. पर्ल गार्डन बाजूची जागा भाडे कराराने देणार पुणे रोडवर पर्ल गार्डनच्या बाजूस टीडीअारपोटी मिळालेली पावणेदोन एकर जागा मंगल कार्यालयासाठी तीस वर्षाच्या भाडे कराराने देण्याची तयारी पालिकेने केली आहे. त्याबाबत टेंडर काढण्यात येणार आहे. रेडिरेकनर दराने िकमान भाडे असणार आहे. त्यापेक्षा जास्त कोण मागेल त्यांना देण्यात येणार आहे. चार पुतळा परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी कोटींच्या कामास महापालिका प्रशासनाने मान्यता दिली आहे, अशी माहिती पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...