आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुस्टर डोससाठी जनतेची कुचराई:जिल्ह्यातील सव्वा 4 लाख जण लसीकरणापासूनच अलिप्त; 18.57 लाख बुस्टर साठी पात्र

सोलापूर2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोविड विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी शासनाच्या आरोग्य विभागाकडून सर्वांना लस दिली जात आहे. मात्र जिल्ह्यातील सव्वा चार लाख नागरिकांनी लसीचा एकही डोस घेतला नाही. दुसरा डोस 11.11 लाख जणांनी घेतला नाही. जिल्ह्यातील 18.57 लाख जण बुस्टर डोस साठी पात्र आहेत. त्यांनी बुस्टर डोस घेण्यासाठी पुढे येत नसल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून लक्षात येते. लसीकरण केंद्रावर नागरिकांना डोस मोफत दिला जात आहे. त्याचच सर्व केंद्रावर मोफत बुस्टर डोस दिला जात असल्याने लसीकरण केंद्रावर गर्दी होत आहे.

जिल्ह्यात लसीकरणासाठी एकूण 34 लाख 14 हजार 400 जण लसीकरणासाठी पात्र आहेत. त्यामध्ये पहिला डोस २९ लाख 94 हजार 620 (87.71टक्के)जणांनी तर दुसरा डोस 23 लाख 03 हजार 041 (67.5टक्के) जणांनी घेतला आहे. पहिला डोस घेतलेले सर्वजण सध्या बुस्टर डोस साठी पात्र आहेत. त्यामध्ये शहरामध्ये 5.50 लाख तर ग्रामीणमध्ये 13.07 लाख जण बुस्टर साठी पात्र आहेत. मात्र जिल्ह्यात लसीकरणाचा तुटवडा असल्याने अडचण निर्माण झाली आहे. दोन दिवसापूर्वी तीन हजार कोविशिल्डचे डोस प्राप्त झाले होते. त्यानुसार लसीकरण सत्र घेण्यात आले.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जे बुस्टर डोस साठी पात्र आहेत अश्यांना 30 सप्टेंबरपर्यंत मोफत लस दिली जाणार आहे. पूर्वी बुस्टर डोस घेण्यासाठी नागरिकांना पैसे मोजावे लागत होते.मात्र आता 18 वर्षाच्या पुढील वयोगटाला मोफत बुस्टर डोस दिला जात आहे. जिल्ह्यात बुस्टर डोस घेणाऱ्यांचे प्रमाण 1 लाख 36 हजार 850 (6.9 टक्के)जणांनी घेतली आहे. तरी बुस्टर डोस घेणाऱ्यांचे प्रमाण नगण्य आहे. तरी ते प्रमाण वाढवण्यासाठी प्रशासनाकडून लसीकरण केंद्रावर मोफत डोस दिला जात आहे.

डॉ. अनिरुध्द पिंपळे म्हणाले की, लसीकरण केंद्रावर बुस्टर डोस मोफत दिला जात आहे. कोविशिल्ड लशीचा तुटवडा आहे. शासनाकडे मागणी केली आहे. मात्र साठाच नसल्याने अडचण आहे. ग्रामीणमध्ये काही लसीकरण केंद्रावर साठा आहे त्यानुसार लसीकरण केले जात आहे. साठा आल्यास लगेच वाटप केले जाईल.

बातम्या आणखी आहेत...