आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विठ्ठलाच्या चरणी पोतेभर खोटे दागिने केले अर्पण:दागिन्यांची विल्हेवाट मंदिर समितीसाठी डोकेदुखी

पंढरपूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात असलेल्या दानपेट्यांमध्ये चक्क खोटे दागिने जमा होण्याचे प्रमाण अलीकडे वाढल्याचे दिसत आहे. मागील वीस वर्षापासून प्रतिकात्मक स्वरूपात सोन्या चांदीचे दागिने भाविक दानपेटीत टाकत आहेत. आजवर जवळपास ३० किलो खोटे दागिने मंदिर समितीजवळ पडून आहेत. त्यांची विल्हेवाट लावणे किंवा जतन करणे मंदिर समितीसाठी डोकेदुखी ठरलेला आहे.

श्री विठ्ठल आणि रखुमाईच्या मंदीरात असलेल्या दान पेटीत सोने आणि चांदीचा मुलामा दिलेले दागिने सातत्याने जमा होत आहेत. यामध्ये हार, नेकलेस, करदोडे, पादुका, माळ, बांगड्या, पैजण, टोप, नथ, झुबे आदींचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांत अशा दागिन्यांची संख्या वाढते आहे. समितीच्या खजिन्यात तीन पोती भरुन ठेवण्यात आली आहेत. दर महिन्याला दान पेट्या खोलून त्यात जमा झालेल्या पैशांची मोजदाद करताना अशा प्रकारचे प्रतीकात्मक दागिने जमा झाल्याचे दिसून येतात. अज्ञात भाविकांनी टाकलेले हे दागिने मंदिर समिती तपासून घेते.

दागिने तपासले जातात
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला भाविकांकडून दान होणारे सोन्या चांदीचे दागिने जमा करून घेताना तपासून घेतले जातात. अपवादात्मक प्रमाणात सोने किंवा चांदीचे प्रतिकात्मक दागिने भाविक पेटीत टाकत असतात, अशा प्रकारचे तीस किलोवर प्रतीकात्मक दागिने समितीकडे जमा आहेत. भाविकांनी विश्वसनीय सराफा कडून दागिने खरेदी करून घ्यावे. त्याचबरोबर समितीकडून त्याची पावती देखील घ्यावी.
बालाजी पुदलवाड, व्यवस्थापक, मंदिर समिती

बातम्या आणखी आहेत...