आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा नोंद:विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूल बस थांबवून चालकाने ढोसली दारू

सोलापूर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी प्रशालेच्या स्कूलबस चालकाने माशाळ वस्ती येथे बुधवारी दुपारी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास स्कूल बस थांबवून दारू ढोसली. यानंतर तो बस चालवण्यासाठी बसमध्ये चढला. मात्र तेथील आरपीआय (अ) च्या पदाधिकाऱ्यांनी चालकास थांबवले. तो मद्यधुंद स्थितीत होता. त्यांनी पालकांना आणि पोलिसांनाही बोलावले. या चालकाच्या विरोधात विजापूर नका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

दशरथ कोळी असे त्या चालकाचे नाव आहे.दशरथ दगडू कोळी (वय ५१ रा. तेलगाव, उत्तर सोलापूर) ही व्यक्ती दुपारी सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास स्कूलचे विद्यार्थी घेऊन माशाळ वस्तीपर्यंत पोहोचला. स्कूल बसमध्ये साधारण २५ विद्यार्थी होते. ती बस रस्त्याच्या कडेला लावून तो खाली उतरून दारू पिऊ लागला.

दारू पिऊन झाल्यानंतर तो बसमध्ये चढला. ही गोष्ट आरपीआयचे संघटक अंबादास शिवशरण यांच्या लक्षात आली. त्यांनी इतर पदाधिकाऱ्यांना सांगून त्या चालकाला थांबवले. त्यानंतर शहराध्यक्ष अतुल नागटिळक यांनी पोलिसांना कल्पना दिली आणि बोलावून घेतले. पोलिस आणि पालक लगेच तेथे आले. यानंतर पदाधिकाऱ्यांनी त्या चालकास विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या पोलिसांच्या स्वाधीन केले, अशी माहिती अतुल नागटिळक यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...