आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरण संतुलन:पोलिस लिपिकाने केलेला लघुपट केंद्राच्या पोर्टलवर

सोलापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात लिपिक असलेल्या अभिजित अधटराव यांचा नवभारत लघुपट केंद्र सरकारच्या पोर्टलवर झळकत आहे. या लघुपटाचे चित्रीकरण सोलापुरात झाले आहे. याच्या निर्मात्या मंजुळा अधटराव असून लेखक व दिग्दर्शन अभिजित अधटराव, छायांकन नदीम शेख, संकलन सौरभ कांबळे, सह-दिग्दर्शन निखिल काळे, सबटायटल प्रा. नागेश खराडे, व्हॉईस ओव्हर - अथर्व लावणीस याचा असून मेहबूब रेकॉर्डिंग स्टुडिओ सोलापूर येथे झाले आहे

या लघुपटात अभिजित अधटराव, देव अधटराव, ओम भोसले, ओंकार जिंदे, नदीम शेख, निखिल काळे, संतोष भोसले, मंजुळा अधटराव, शाम खंडेलवाल, बाळासाहेब गवळी या कलाकारांनी काम केले आहे. सरकारी नोकरी सांभाळत एक सामाजिक बांधिलकी व अंगी असलेली कला व छंद च्या माध्यमातून यापूर्वी बंदपाकीट लघुपट बनविला. त्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले.

असा आहे विषय
मोबाइलमुळे लहान मुलांच्या वागण्यात होणारा बदल, पालक व समाजाचा मुलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन, देशप्रेम, पर्यावरण संतुलन व सामाजिक बांधिलकी इ. वर भाष्य करणारा हा लघुपट आहे.

बातम्या आणखी आहेत...