आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:मोबाइल गल्लीत चोराने दुकान फोडले आठ लाखांचे संच, 37 मिनिटांत पसार

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मोबाइल गल्लीतील एस. एस. मोबाइल दुकानात चोराने अवघ्या ३७ मिनिटांत आठ लाख रुपये किमतीचे महागडे मोबाइल आणि १ लाख ३५ हजारांची रोकड पळविली. हा प्रकार सोमवारी पहाटे अडीचच्या सुमारास झाला आहे. याबाबत अशोक आहुजा यांनी फौजदार चावडी पोलिसात प्राथमिक माहिती दिली आहे.

एस.एस. मोबाइल हे दुकान अहुजा हे चालवतात. ओपो आणि विवो या कंपनीचे महागडे ४५ मोबाइल चोरीला गेले आहेत. किमान १५ ते ४० हजार किमतीचे मोबाइल होते. चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

शटरचा मधला भाग वाकवून चोर दुकानात आले. सुरुवातीला एक जण आत आला. थोड्या वेळाने एका पाठोपाठ दोघेजण आले. ड्राव्हरमधून १ लाख ३५ हजार रुपये काढून घेतले. शोकेसमध्ये ठेवलेले ते ४२ ते ४५ महागडे मोबाइल (विवो, ओपो कंपनीचे) चोरीला गेले आहेत, अशी माहिती विशाल आहुजा यांनी दिली. चोरी करताना बॅटरीचा प्रकाश पाडला. सोलापुरात एस. एस. मोबाइल शॉपीच्या चार ते पाच शाखा आहेत. कोल्हापूरला मुख्य दुकान आहे. मोबाइल गल्लीतील सलगर कॉम्प्लेक्समध्ये हे दुकान आहे. याबाबत विशाल आहुजा म्हणाले, पहाटे अडीचच्या सुमारास चोर आले आणि तीन वाजून सात मिनिटांनी चोरी करून गेले. संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला आहे. शटरचा मधला दरवाजा वाकवून आत आले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार ४३ ते ४५ मोबाइल आणि पैसे नेले आहेत. पोलिसांना प्राथमिक माहिती दिली आहे. पोलिस निरीक्षक विकास देशमुख म्हणाले, चोरीनंतर पोलिस पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. ते मंगळवारी तक्रार देणार आहेत असे ते म्हणाले.

मुख्य रस्त्यावरच चोरी मुख्य रस्त्यावरच हे दुकान आहे. एकूण चार चोर होते. तिघेजण दुकानात आले होते. एक जण बाहेर थांबला होता.

तीन वर्षापूर्वी चौपाडमधील एक दुकान, मोबाइल गल्लीतील एक दुकान, जुना एम्प्लॉयमेंट चौकातील एक दुकान, अशोक चौकातील एक दुकान आणि विजापूर रोडवरील एक दुकान अशी एकाच दिवशी तीन मोबाइल दुकाने आणि एका इलेक्ट्रॉनिक दुकानमध्ये चोरी झाली होती. याशिवाय मोबाइल गल्लीतील ३-४ मोबाइल दुकानात यापूर्वी चोरी झाली आहे.

चोरीची माहिती कळताच पोलिस उपायुक्त वैशाली कडूकर, बापू बांगर, गुन्हे शाखेचे निरीक्षक सुनील दोरगे, निरीक्षक विकास देशमुख, गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी आले होते. श्वान पथकही आणले होते. पोलिस तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...