आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
माढा तालुक्यातील शिंगेवाडी येथे ट्रॅक्टरवर खेळत असलेल्या सहा वर्षीय चिमुकल्यावर काळाचा घाला आला. ट्रॉलीसह ट्रॅक्टर विहिरीत पडल्याने या मुलाचा मृत्यू झाला. गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. शंकर पांडुरंग शिंदे असे मृत्यु झालेल्या त्या चिमुकल्याचे नाव आहे. ग्रामस्थ, नातेवाईकाच्या मदतीने विहिरीतील पाणी काढुन तब्बल सहा तासांनी मृतदेह व टॅक्टर बाहेर काढण्यात आले. कुर्डूवाडी ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी पहाटे दोन वाजता शंकरचे शवविच्छेदन करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार मृत शंकरचे वडील पाडुरंग यांनी शेतातील काम करुन ट्रॅक्टर विहिरीच्या कडेला लावला होता. ट्रॅक्टर लावलेल्या ठिकाणची जमीन अगोदरच पावसाने भुसभुशीत झालेली आणि त्याच जमिनीला पाणी देखील दिले होते. ओलसर जमीन खचली आणि उताराला असलेला ट्रॅक्टर अन् त्यावरील मुलगा थेट विहिरीत जाऊन कोसळला. दररोज घरच्या अंगणात अन् शेतात खेळत बागडत असलेल्या शंकरच्या मृत्यूने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावात शोकाकुल वातावरण पसरले. कुर्डूवाडी पोलिस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पोलिस हवालदार पि.एस.दराडे अधिक तपास करीत आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.