आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मरवडे रोडवरील घटना:पार्किंग लाइट न लावता रस्त्यावर उभ्या ट्रकला टेम्पोची मागून धडक, चालक ठार

मंगळवेढा22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एअर पकडल्याने रस्त्यावर पार्किंग लाइट न लावता उभे असलेल्या ट्रकला मध्य प्रदेश येथून लोखंडी साहित्य घेऊन निघालेल्या टेम्पोने पाठीमागून धडक दिल्याने टेम्पोचालक सबाबखान युसुबमल्लाई खान (वय ६०) यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रकचालक सय्यद उस्मान सरवर (रा. शहीनशहा नगर कोलार, कर्नाटक) याच्यावर मंगळवेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्याद अक्रम युसुब शहा (वय ५० रा. केसुर, जि. धारूर, मध्य प्रदेश) यांनी दिली. ही घटना १२ सप्टेंबर रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास मंगळवेढा ते मरवडे रोडवरील इंडियन पेट्रोल पंपाजवळ घडली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी : मध्य प्रदेश येथून लोखंडी पायलेट साहित्य घेऊन निघालेला आयशर टेम्पोचा (एमपी ४१ जीए ११२१) चालक सबाबखान युसुबमल्लाई खान हा अहमदनगर पंढरपूर, मंगळवेढा मार्गे कर्नाटकातील किर्लोस्कर कंपनीकडे जात होता. मंगळवेढा ते मरवडे रोडवरील इंडियन पेट्रोल पंपाजवळ आला असताना अचानक रस्त्यावर ट्रकने (केए १४ बी २१६४) एअर पकडल्याने पार्किंग लाइट न लावता उभा होता. ट्रकच्या साइडला किंवा मागे कोणतेही सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या नसल्याने या टेम्पोचालक सबाबखान टेम्पो बाजूला घेत असताना समोर उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिल्यामुळे तो जागीच ठार झाला. फिर्यादी अक्रम शहा यास उजव्या पायाला मार लागला आहे. अपघातात टेम्पोचे ४० हजारांचे रुपये नुकसान झाले. तपास पोहेकॉ नवले करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...