आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रंथोत्सवाचे आयोजन:जिल्हा ग्रंथालयातर्फे‎ दोन दिवसीय ग्रंथोत्सव‎

सोलापूर‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा ग्रंथालय अधिकारी‎ कार्यालयाच्या वतीने शुक्रवार दि. १३‎ व शनिवार दि. १४ जानेवारी या‎ कालावधीत दोन दिवसीय‎ "ग्रंथोत्सव-२०२२'' चे आयोजित‎ शिवछत्रपती शिवाजी महाराज,‎ सांस्कृतिक भवन, (रंगभवन) येथे‎ करण्यात येणार आहे.‎ ग्रामीण व शहरी भागातील‎ जनतेच्या वाचन संस्कृतीमध्ये वाढ‎ व्हावी, या हेतूने राज्य शासनातर्फे‎ ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात‎ येते.

जिल्ह्यातील ग्रंथप्रेमींना एकाच‎ ठिकाणी विविध ग्रंथ प्राप्त व्हावेत,‎ यासाठी तसेच प्रकाशक व ग्रंथ‎ विक्रेता यांना ग्रंथ विक्रीसाठी‎ एकाच ठिकाणी आवश्यक ती‎ सुविधा उपलब्ध व्हावी, हा‎ ग्रंथोत्सव आयोजनाचा हेतू आहे.‎ या अनुषंगाने ग्रंथदिंडी, परिसंवाद,‎ व्याख्यान, कवी संमेलन आदी‎ प्रबोधनात्मक व सांस्कृतिक‎ कार्यक्रमांचा या ग्रंथोत्सवात‎ समावेश असणार आहे.

तसेच‎ साहित्य जगतातील नामवंत‎ साहित्यिकांच्या ग्रंथ संपदेसाठी ग्रंथ‎ दालन उभारले जाणार आहे.‎ वाचन प्रेमींसाठी ही ग्रंथसंपदा‎ वाचनासाठी व खरेदी करण्यासाठी‎ उपलब्ध असणार आहे.‎ या ग्रंथोत्सवामध्ये ग्रंथाचे स्टॉल‎ लागणार असून इच्छुकांनी प्रमोद‎ पाटील ९९२१८००४७५ प्रदीप गाडे‎ ९५९४९८९२५० यांच्याशी संपर्क‎ साधावा असे आवाहन जिल्हा‎ ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव‎ यांनी केले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...