आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:रस्ता ओलांडताना जीपच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

सोलापूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रस्ता ओलांडताना भरधाव जीपच्या धडकेत एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ज्ञानेश्वर सदाशिव आवताडे (वय ३०, रा. पाकणी) असे मृत तरुणाचे नाव आहे. हा अपघात शनिवारी सायंकाळी साडेचार वाजता घडला होता. त्याच्यावर सोलापूर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा काही वेळाने मृत्यू झाला.

रस्ता ओलांडताना पंढरपूरहून सोलापूरच्या दिशेने येणारी जीप ( केए १६ एन ३६७४) याची धडक बसली. गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. याबाबत आवताडेच्या वडिलांनी सोलापूर तालुका पोलिसात फिर्याद दिली आहे. वाहनचालकावर गुन्हा दाखल झाला आहे. फौजदार बाळू राठोड तपास करत आहेत. ज्ञानेश्वर आवताडे हा पाकणी परिसरातील चहा कॅन्टीनवर तो काम करत होता असे सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...