आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदर्श:निमगावच्या तरुणाचे विधवेशी लग्न, मुलीलाही स्वीकारले; अजित शिंदे यांचे अनुकरणीय पाऊल

माढा23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुन्या विधवा प्रथांना छेद देत निमगाव (मा.) येथील अजित शिंदे या तरुण शेतकऱ्याने अंजनगाव (उमाटे) गावातील विधवा महिला राणी उमाटे यांच्याशी विवाह करून सामाजिक भान राखत समाजापुढे आदर्श ठेवलाय.

विधवा पुनर्विवाहाची चळवळ सुरू होऊन अनेक वर्षे लोटली. पण आजही समाजाच्या अनेक भागात तरुण वयात विधवा झालेल्या स्त्रियांबद्दल काही लोक जुनाट विचार बाळगतात. मात्र याला बगल देत अजित शिंदे याने हे पाऊल उचलले आहे. अंजनगाव (उमाटे) गावात हा विवाह थाटामाटात पार पडला. राणी उमाटे यांचे पती आनंद यांचे निधन झाले होते. ७ वर्षांपासून त्या मुलीसह अंजनगावमध्ये राहतात. अजितने राणी यांच्या समवेत लग्न करण्याचा निर्णय घेतला. तसेच त्यांच्यासह एका मुलीचा स्वीकार करण्याचा निर्णय घेऊन जबाबदारी घेऊन तो विवाहबंधनात अडकला आहे. राज्यभरातील ग्रामपंचायतीमध्ये विधवा प्रथा बंद करण्याचे ठराव घेतले जात आहेत. अशातच विधवा महिलेशी तरुण शेतकऱ्याने केलेल्या लग्नाचा विषय समाजापुढे अनुकरणीय असाच आहे.

युवकांनी निराधार स्त्रीला आधार देऊन समाजानेही तिला संरक्षण देणे गरजेचे आहे. विचारसरणी बदलणे आवश्यक आहे. राणी उमाटे, वधू

विधवेच्या बाबतीत समाजात आजही हीन वागणुकीची परंपरा आहे. ती प्रथा बंद करण्याच्या दृष्टीने काम सुरू आहे. अजित शिंदे, वर

बातम्या आणखी आहेत...