आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालव्ह यू माॅम असे सोशल मीडियावर स्टेटस ठेवत राहुल भीमण्णा व्हनकळस (वय २३, रा. चिंतलकर वस्ती, मोदीखाना) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार शनिवारी दुपारी एक वाजता समोर आला. राहुल हा एनटीपीसी (होटगी) येथे कामाला होता. तो आईसोबत राहत होता. लहानपणीच वडील वारलेले. भाऊ, बहीण कोणीच नाही. आईचा आधार तोच आणि त्यानेच घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तो खूप वेळ खोलीतून बाहेर आला नाही म्हणून पाहिले असता लोखंडी अँगलला साडीने गळफास घेतल्याचे समोर आले. सकाळी अकरा ते एकदरम्यान ही घटना घडली.हा प्रकार पाहून नातेवाइकांनी सदर बझार पोलिसांना माहिती दिली आणि उपचाराला शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर मरण पावल्याचे सांगण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.