आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण:अभिजित पाटलांमुळे पंढरीत वाढेल राष्ट्रवादीचे बळ‎, पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यात मिळाला सर्वसमावेशक चेहरा‎

नवनाथ पोरे | पंढरपूर‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

श्री विठ्ठल सहकारी साखर‎ कारखान्याचे चेअरमन अभिजित‎ पाटील यांनी खासदार शरद पवार‎ यांच्या उपस्थितीत रविवारी राष्ट्रवादीत‎ प्रवेश केला आहे. अभिजित‎ पाटलांच्या प्रवेशाने बालेकिल्ल्यात‎ राष्ट्रवादीला तरुण चेहरा मिळाला‎ आहे.

गेल्या काही वर्षांपासून‎ राष्ट्रवादी, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या‎ संपर्कात असलेले अभिजित पाटील‎ नेमके कोणत्या पक्षाचे? असा निर्माण‎ झालेला संभ्रम रविवारी दूर झाला.‎ राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद‎ पवार, जिल्हाध्यक्ष बळीराम साठे,‎ आमदार रोहित पवार, आमदार‎ बबनराव शिंदे, आमदार कैलास‎ पाटील, आमदार रवींद्र धांगेकर,‎ आमदार यशवंत माने, आमदार संजय‎ शिंदे, माजी आमदार राजन पाटील,‎ दीपक साळुंखे, महेश कोठे, उमेश‎ पाटील आदींसह राष्ट्रवादीचे‎ पदाधिकारी उपस्थित होते.

अभिजित‎ पाटील यांनी मागील चार ते पाच‎ वर्षांपासून साखर कारखानदारीत मोठे‎ नाव कमावलेले आहे. चार खासगी‎ आणि एक सहकारी असे पाच साखर‎ कारखाने चालवणारे अभिजित पाटील‎ अल्पावधीत आपल्या कार्यशैलीमुळे‎ राज्यभरात चर्चेत आलेले आहेत.‎ अभिजित पाटील यांचे भारतीय जनता‎ पक्ष तसेच राष्ट्रवादीत आणि ठाकरे‎ यांच्या शिवसेनेतही नेत्यांशी‎ सलोख्याचे संबंध आहेत.

ठाकरे‎ गटाचे उस्मानाबादचे आमदार कैलास‎ पाटील यांचे ते नातेवाईक आहेत. तर‎ भाजपचे आमदार सुभाष देशमुख हे‎ सुरुवातीच्या काळात त्यांचे गॉडफादर‎ राहिलेले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र‎ फडणवीस, भाजपचे नेते प्रवीण दरेकर‎ यांच्याशीही अभिजित पाटील यांची‎ सलगी आहे.‎ त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये‎ अभिजित पवार यांच्या माध्यमातून थेट‎ पावर घराण्याशी अभिजित पाटील‎ यांची जवळीक निर्माण झाली आहे.‎

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना‎ व सांगोला साखर कारखाना‎ चालवण्यासाठी अभिजित पाटील‎ यांना आमदार रोहित पवार यांची मोठी‎ मदत झाल्याची चर्चा आहे.‎

भालके-काळे गटाला न‎ विचारताच पक्षप्रवेश‎

विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात‎ सध्या काम करत असलेल्या काळे आणि‎ भालके-पाटील गटाला न विचारताच‎ अभिजित पाटील यांना प्रवेश दिलेला आहे.‎ आता पाटील यांच्यापुढे होणाऱ्या स्थानिक‎ स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिंकण्याचे‎ आव्हान पाटील यांच्यासमोर असणार‎ आहे. पाटील यांच्या रूपाने राष्ट्रवादी‎ काँग्रेसला सोलापूर जिल्ह्यात एक तरुण‎ आणि आश्वासक चेहरा मिळाला आहे.‎