आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील कन्या प्रशाला चौकात रस्ता ओलांडत असताना झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला. मुंबईहून सोलापूरकडे निघालेल्या कंटेनरने धडक दिली. अपघात रविवारी दुपारी सव्वाचारच्या सुमारास घडला.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई कडून सोलापूरकडे निघालेला कंटेनर (एमएच ४६, बीयू ४६०५) येथील कन्या प्रशाला चौकात अनोळखी इसम रस्ता ओलांडत असताना कंटेनरने त्याला जोराची धडक दिल्याने तो कंटेनरच्या मागील चाकाखाली येऊन जागीच ठार झाला. याप्रकरणी मोहोळ पोलिस ठाण्यात कंटेनर चालक संभाजी विलास कोळेकर (रा. आरेवाडी, ता. कवठेमहांकाळ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस फौजदार ज्योतिबा पवार करीत आहेत.
पांढरे पट्टे, आयक्याटचे दिवे बसवण्याची मागणी सदरचा कन्या प्रशाला चौक हा अपघाती झोन असतानाही सावळेश्वर टोल प्लाझाकडून सदर चौकात केवळ पांढरे पट्टे ओढले जात आहेत, त्याठिकाणी गतिरोधकच्या थार्माप्लास्टच्या पट्ट्या व आयक्याटचे दिवे बसवण्याची वाहन चालकांची व नागरिकांची मागणी असतानाही सावळेश्वर टोल प्लाझाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असून, त्यामुळे त्या परिसरात सातत्याने अपघाताची संख्या वाढत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.