आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:बार्शी -सोलापूर रस्त्यावर शेळगाव येथे अपघात; दोन जण जागीच ठार

वैराग3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बार्शी-सोलापूर मार्गावर शेळगावजवळ गुरुवारी पहाटे ट्रक व वॅगनर कारचा अपघात होऊन कारमधील दोघे जण रघुनाथ भगवान डोरले, (वय ४२, रा. सांगली), (अमित अशोक कोथळे वय ४५, रा. सांगली) यांचा जागीच मृत्यू झाला. कारमधील तिसरी व्यक्ती श्री. देशमख गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सोलापूर येथील मार्कंडेय हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. याबाबतची माहिती वैराग पोलिसांनी दिली.

याबाबत सांगली येथील रघुनाथ डोरले, अमित कोथळे आणि श्री.देशमुख हे तिघेजण चारचाकीमध्ये बार्शी परिसरातील एका गावामध्ये लग्नासाठी आले होते. लग्न उरकून चारचाकीमधून (क्रमांक एम एच १२ एल जे ७०४५ )माघारी सांगलीकडे जात असताना तर सोलापूर होऊन शेळगावमार्गे धामणगावकडे येत असताना ट्रक (क्रमांक एम एच ११ ए एल ७००९ ) या दोन वाहनांचा समोरासमोर भीषण अपघात झाला. हा अपघात शेळगाव येथे पहाटे दोन वाजून चाळीस मिनिटांनी झाला. या अपघातात वॅगनार कारमधील मधील दोघेजण जागीच मृत झाले. या अपघाताची नोंद वैराग पोलिस ठाण्यात अद्याप झाली नाही. याबाबतचा पुढील तपास पोलिस कॉन्स्टेबल शिवाजी हळे हे करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...