आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:मंगळवेढा-पंढरपूर रस्त्यावर अपघात; 12 जण जखमी

मंगळवेढा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवेढा ते पंढरपूर रोडवर महादेव मंदिराजवळ एमआयडीसी समोर झालेल्या तिहेरी अपघातात १२ जण गंभीर जखमी झाले. जखमींवर मंगळवेढा येतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. टेम्पो, कार व दुचाकीचा अपघात रविवारी दुपारी झाला.

एमआयडीसीसमोर आयशर टेम्पो (जीजे -१३ ए डब्ल्यू ८२७९), मोटरसायकल (एम एच -१३ ए ८६०८) व कार (एम एच -०२ ई एच ७८६७) या तिन्ही वाहनाचा अपघात झाला. अपघातानंतर टेम्पोचा चालक पळून गेला आहे. टेम्पो पंढरपूरकडे जात होता तर वॅगनर कार ही मंगळवेढ्याकडे येत होती. कारच्या चालकाचा ताबा सुटल्याने समोरून येणाऱ्या टेम्पोला जोराची धडक बसली.

बातम्या आणखी आहेत...