आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागर:सावित्रीबाईंच्या विचाराने शिक्षणाचा ध्यास घेत मुलींनी प्रगती करावी

मोहोळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सावित्रीबाईंनी मुलींच्या शिक्षणाची गरज ओळखून ज्योतिबांच्या मदतीने काम केले. आज त्यांच्याच विचाराने मुलींनी शिक्षणाचा ध्यास धरून प्रगती करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी केले. त्या मोहोळमध्ये आयोजित किशोरी हितगूज मेळाव्यात बोलत होत्या. मेळाव्यास १५ केंद्रांतून तालुक्यातील ७०० मुली उपस्थित होत्या.

प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सोलापूर व मोहोळ पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी मोहोळ येथील नेताजी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात तालुकास्तरीय किशोरी हितगुज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे बोलत होत्या.

अध्यक्षस्थानी सिद्धी ताकमोगे होत्या. श्रेया बचुटे, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी संजय जावीर, गटविकास अधिकारी आनंदकुमार मिरगणे, शिक्षण विस्ताराधिकारी हरीश राऊत, गटशिक्षणाधिकारी मल्लिनाथ स्वामी, विस्ताराधिकारी विकास यादव, स्वाती स्वामी, गोदावरी राठोड, नेताजीचे प्राचार्य डॉ. श्रीधर चव्हाण, विजयराज घाडगे, केंद्रप्रमुख हमीदखा पठाण, डॉ. सानिका झाडबुके, अॅड. मंदाकिनी काकडे, डॉ. स्मिता पाटील, संगीता फाटे, महिला वाहक ज्योती गायकवाड आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रिबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमासाठी धनाजी शितोळे, तानाजी देशमुख, राजाराम बाबर, लक्ष्मण भोसले, महेश लोंढे, सुरेखा कांबळे, सुहास जाधव, परमेश्वर पाटील, अरविंद गोडसे तुषार पाटील अभिजीत खोत रामहरी नवले दत्तात्रेय भोसले दीपक माने चंद्रकांत कोळी उस्मान पठाण आदींसह तालुक्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळेच्या शिक्षकांनी प्रयत्न केले.

कथाकथन, काव्यवाचन, गायनातून बेटी बचाओचा संदेश मोहोळ तालुका गीतमंचच्या वतीने स्वागतपर गीत सादर करण्यात आले. या वेळी योग प्रात्यक्षिके, मुलींच्या शिक्षणविषयक गाणी, काव्य वाचन व कथाकथन, बेटी बचाओ बेटी पढाओ, विविध स्पर्धा, व्याख्यान आदी कार्यक्रमांचे मुलींसाठी आयोजन करण्यात आले होते.

मुलींच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी वेधले लक्ष सोहाळे जिल्हा परिषद शाळेच्या मुलींनी सादर केलेले लेझीम व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे नेताजी प्रशालेचे प्रांगण मुलींच्या कलागुणांनी भरून गेले होते. वाड्या-वस्त्यांवरील मुलींनी सहभाग घेतला.

बातम्या आणखी आहेत...