आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:वडिलांच्या मृत्युपत्रानुसार उत्पन्नाचा वाटा दिला नाही; आईला दरमहा 8 हजार पोटगी देण्याचे मुलांना आदेश

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण कायद्यानुसार प्रांताधिकाऱ्यांनी केला निवाडा

वडिलांनी लिहून ठेवलेल्या मृत्युपत्राप्रमाणे मुलांनी उत्पन्नातील वाटा आईला दिला नाही. त्यामुळे आईला पोटगी मागण्याची वेळ आली. ज्येष्ठ नागरिक निर्वाह व कल्याण अधिनियमानुसार आईने प्रांताधिकाऱ्यांसमोर अर्ज केला. त्यावर मुलांकडून खुलासे मागवण्यात आले. खुलाशात मुलांनी मृत्युपत्राचा वाद न्यायालयात प्रलंबित असल्याचे सांगितले. प्रांताधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या निर्णयास अधीन राहून उत्पन्नातील वाट्यासह दोन्ही मुलांनी दरमहा प्रत्येकी ४ हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश केला. म्हणजेच त्या आईला आता उत्पन्नातील वाट्यासह दरमहा ८ हजार रुपये पोटगीपोटी मिळणार आहेत. दिवंगत माजी उपमहापौर नारायण व्यंकटय्या पिट्टा यांच्या कुटुंबातील ही कहाणी.

अक्कलकोट रस्त्यावरील एमआयडीसीत त्यांचा ४४ यंत्रमागांचा कारखाना आहे. त्यांनी हयातीतच हा कारखाना भाड्याने दिला. त्यानंतर मृत्युपत्र करताना ४४ पैकी ८ यंत्रमागांचे भाडे पत्नी सरोजिनी पिट्टा यांना देण्यात यावे, असे लिहून ठेवले. दरम्यान, २५ ऑक्टोबर २०१५ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले आणि तीन मुली कायदेशीर वारस आहेत. श्रीनिवास आणि भास्कर ही दोन्ही मुले विभक्त झाली. सरोजिनी पिट्टा आता सुजाता या विधवा मुलीसोबत राहतात.

शेवटी आदेश
अर्जदार आई वयोवृद्ध असल्याने मुलांनी तिच्या पालनपोषणाची जबाबदारी घेणे ही नैतिकता आहे. त्यानुसार दोन्ही मुलांनी दरमहा पोटगी आणि कारखान्यातील ८ यंत्रमागांचे भाडेदेखील आईला द्यावेत.

आईचा अर्ज, मुलांचे खुलासे अन् अधिकाऱ्यांची निरीक्षणे

  1. मृत्युपत्राप्रमाणे ८ यंत्रमागांचे भाडे आईला देणे मुलांना मान्य. परंतु मृत्युपत्र प्रकरणच दिवाणी न्यायालयात गेले, जे सध्या प्रलंबित आहे.
  2. कारखान्यातील ४४ यंत्रमाग चिंताकिंदी आणि कुरापाटी यांना भाडेतत्त्वावर दिले आहे. त्याचे भाडे मुले घेतात. वडिलांच्या नावे असलेले प्लॉट्स विकले.
  3. श्रीनिवास या मुलाने तर अपघात झाल्यानंतर त्याचा खर्च वडिलांनी केल्याचा खुलासा केला. परंतु स्वत:च्या उदरनिर्वाहाचा उल्लेख मात्र केलेला नाही.
  4. दुसरा मुलगा भास्कर ४ यंत्रमागांचे भाडे ८ हजार ४०० रुपयेप्रमाणे धनादेशाद्वारे देत होता. २७ मे २०१९ नंतर का दिले नाही, याबाबत काहीच भाष्य नाही.
बातम्या आणखी आहेत...