आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कारवाई:वेळेत हजर न झालेल्या खुनातील पॅरोलवरील आरोपीला साधूच्या वेशात करमाळ्यातून अटक; 14 जून रोजी गुन्हा दाखल

करमाळा16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सात वर्षांची शिक्षा भोगत असताना कोविड काळात पंचेचाळीस दिवस व ६९० दिवस कोरोना काळ अशी पॅरोल रजा मिळवल्यानंतर आरोपी घरी गेला पण माघारी आलाच नाही. त्यामुळे पुण्याच्या येरवडा कारागृहामार्फत करमाळा पोलिस ठाण्यात १४ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

करमाळा तालुक्यातील पोलिसांनी त्याचा शोध घेतला तेव्हा तो मिरगव्हाण, ता. करमाळा येथे साधूच्या वेशात फिरत असल्याचे पोलिसांना आढळले. त्यास ताब्यात घेतले. मोतीराम मरिबा ओहोळ रा. मिरगव्हाण असे आरोपीचे नाव आहे.

२०१८ मध्ये बार्शी येथील न्यायालयाने त्यास सात वर्षे शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्यास अटक करून येरवडा कारागृह पुणे येथे पाठवण्यात आले होते. मिरगव्हाण ता. करमाळा येथील एका प्रकरणात मोतिराम ओहोळ याच्यावर एकाच्या मृत्यूस जबाबदार असल्याचा गुन्हा सिद्ध झाला होता. त्याला बार्शी न्यायालयाने सात वर्षे व दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली होती. ओहोळ याला पुणे येथील येरवडा कारागृहात ठेवण्यात आले होते. कोरोना देशभर परसला तेव्हा ओहोळ याला पॅरोल रजा देण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...