आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन वर्षांचा‎ शैक्षणिक खर्च उचलणार‎:आचार्य अकॅडमी 20 विद्यार्थ्यांची‎ जेईई, नीटची तयारी करून घेणार‎

सोलापूर‎21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आचार्य अकॅडमी ज्ञानदान योजनेअंतर्गत २०‎ विद्यार्थ्यांचा अकरावी व बारावी या दोन‎ वर्षांचा शैक्षणिक खर्च उचलणार आहे. या‎ विद्यार्थ्यांकडून जेईई, नीट आणि‎ एनडीएसारख्या परीक्षांसाठी तयारी करून‎ घेतली जाणार आहे. तसेच जिल्हा परिषदेतील‎ सातवीच्या हजार विद्यार्थ्यांना डॉक्टर,‎ इंजिनिअर करण्यासाठी शैक्षणिक मदत व‎ मार्गदर्शन करणार असल्याची माहिती,‎ समन्वयक घनश्याम केळकर यांनी दिली.‎ अकादमीची सर्व जिल्ह्यात जाणारी‎ शोधयात्रा आता सोलापुरात आहे.‎ बारामतीच्या अकॅडमीच्या स्व. रामजी राघोजी‎ मुटकुळे ज्ञानदान योजनेअंतर्गत शैक्षणिक‎ मदत दिली जाते. ही योजना गरजूंपर्यंत‎ पोहोचण्यासाठी शोधयात्रेचे आयोजन केले‎ गेले आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी‎ विद्यार्थ्यांनी अकॅडमीच्या वेबसाइटवर नोंदणी‎ करावी, असे आवाहन केले आहे.‎ या पत्रकार परिषदेस श्रीपाद वेणुगुरकर,‎ योगीन गुजर आदी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...