आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Solapur
  • Action In Railway Station Area, Removed Encroachments On Sidewalks; Traffic Control Police, Municipal Encroachment Department Together |marathi News

मोहीम:रेल्वे स्टेशन परिसरात कारवाई, फुटपाथवरचे अतिक्रमण हटवले; वाहतूक नियंत्रण पोलिस, महापालिका अतिक्रमण विभाग एकत्र

सोलापूर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेल्वे स्टेशन परिसरातील फुटपाथवरील अतिक्रमण शनिवारी सकाळी महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत हटवले आहेत.

रेल्वे स्टेशन परिसरात दोन्ही बाजू बाजूला, पोस्ट कार्यालय व सिटी बस स्टॅन्डच्या बाजूने संपूर्ण फुटपाथवर चहागाडी, खाद्यपदार्थ विक्री गाडी, भजी, भेळ गाडी, फळविक्रेते यांनी ठाण मांडले होते. यामुळे वाहतूक कोंडी वारंवार या ठिकाणी होते.

याबाबत पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे, सहाय्यक पोलिस आयुक्त अजय परमार , पोलिस निरीक्षक विश्वनाथ सिद्ध आणि धनाजी शिंगाडे यांच्यासह महापालिकेचे अतिक्रमण विभागातील अधिकारी, कर्मचारी, पोलिस कर्मचारी असा मोठा फौजफाटा सकाळी अकराच्या सुमाराला याठिकाणी दाखल झाला. संपूर्ण स्टेशन परिसरातील फुटपाथवरील अतिक्रमण हटविण्यात आले आहे.

याबाबत बोलताना पोलिस निरीक्षक विश्वनाथ सिद म्हणाले, या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्यामुळे अतिक्रमण काढण्यात आले आहे. कायमस्वरूपी आता या ठिकाणी पोलिसांचा पहारा राहील. अतिक्रमण होणार नाही, यासाठी आम्ही लक्ष घालू अशी माहिती त्यांनी दिली. सर्व हातगाडी जप्त करून महापालिकेच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

पार्क चौकात नियम मोडल्याने वाहनांवर कारवाई
सायंकाळी पार्क चौक ते चार पुतळा परिसरात चुकीच्या दिशेने ये-जा करणारे दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहनावर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. काही वाहने जप्त करून वाहतूक शाखेत जमा करण्यात आले आहेत. चौपाटीच्या दिशेने काही वाहने चुकीच्या दिशेने येतात. यामुळे वाहतूक कोंडी, किरकोळ अपघाताचे प्रमाण जास्त असल्यामुळे ही कारवाई मोहीम अचानक राबवण्यात आली. सुमारे ४० ते ५० वाहनांवरती कारवाई झाली. काही दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...