आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागर:चंद्रभागेचे प्रदूषण रोखण्यास शासकीय योजनांचा कृतिसंगम; नमामि चंद्रभागा अंतर्गत नदीकाठी सेंद्रिय शेतीचा जागर

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘नमामि चंद्रभागा’ अंतर्गत भीमा नदीचे प्रदूषण रोखणे, नदीकाठची शेती सेंद्रिय करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व विभागच्या वतीने कृतिसंगम अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. भीमा नदी वाहणाऱ्या जिल्ह्यातील ९ तालुक्यांतील १० गावांमध्ये पहिल्या टप्प्यात अभियानची सुरुवात होईल.जिल्हा परिषदेत आज भीमा नदीकाठच्या गावात प्रदूषण रोखणेसाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत गुरुवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, जिल्हा कृषी अधिकारी विवेक कुंभार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डाॅ. नवनाथ नरळे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, तसेच कृषी विस्तार अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नमामि चंद्रभागा हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. नदीकाठच्या शेतीमध्ये होणाऱ्या रासायनिक खतांचा वापर कमी करून त्यांना सेंद्रिय शेतीकडे वळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पशूंच्या मल-मूत्राचे व्यवस्थापन करण्यासाठी गांडुळखत प्रकल्प, स्लरी, तसेच कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करणे, गोबर गॅस, गोबरधन बाबत जनजागृती करून नदीकाठच्या शेतकरी बांधवांमध्ये जनजागृती करण्यात येईल, असेही सीईओ स्वामी यांनी सांगितले. नदीकाठच्या गावातील पशुपालक नदीपात्रात जनावरे धुतात. त्यासाठी दुसरी उपाययोजना करण्याबाबत चर्चा झाली.नदीपात्राच्या बाजूने स्थानिक प्रजातीची रोपं लावून जमिनीची धूप थांबविण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत कृती धोरण निश्चित करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...