आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:सोलापुरात तीन ठिकाणी मटका घेताना कारवाई, आठ जणांवर गुन्हा दाखल

सोलापूर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापुरात फौजदार चावडी आणि सदर बझार पोलिस हद्दीत तीन ठिकाणी मटका घेताना पोलिसांनी कारवाई केली आहे. माने पान शॉप शेजारी आनस हॉटेल बाजूला रस्त्यावर लोकांकडून मटका लिहून घेताना गुन्हा दाखल झाला आहे. संतोष माणिक शेळके, सूर्यकांत अप्पासाहेब करपे, सुहास सूर्यकांत पाटील या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

त्यांच्याकडून १९०० रुपये जप्त केले आहेत. हवालदार कुमार शेळके यांनी १३ जून रोजी फौजदार चावडी पोलिसात फिर्याद दिली आहे. दुसऱ्या घटनेत शासकीय रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला फुटपाथवर लोकांकडून मटका लिहून घेताना अब्दुल कयुम अ. रहमान शेख, जुबेर ढालायत या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. हवालदार अब्रार दिंडोरे यांनी सदर बझार पोलिसात १३ जून रोजी तक्रार दिली आहे. त्याच्याकडून ८७५ रूपये जप्त करण्यात आले आहेत. तिसऱ्या घटनेत जुबेर ढालयत, महिबूब शेख आणि रजाक शेख या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. हवालदार विनोद राजपूत यांनी सदर बझार पोलिसात १३ जून रोजी फिर्याद दिली आहे. रेल्वे स्टेशन जवळील काडादी चाळीच्या बाजूला रस्त्यावर हा प्रकार सुरू होता. २ हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. जुबेर आणि रजाक यांच्या सांगण्यावरून महिबूब हा लोकांकडून मटका लिहून घेत होता असे पोलिसांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...