आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:घरगुती गॅस रिक्षात भरताना‎ कारवाई, दोघांवर गुन्हा‎

सोलापूर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरगुती वापराच्या गॅस‎ सिलिंडर टाकीतून रिक्षात बेकायदेशीरपणे‎ गॅस भरून देताना दोघांविरुद्ध गुन्हा दाखल‎ झाला आहे. अताहुलाखान हारून पठाण‎ (वय ४५, रा. लोकमान्य नगर,‎ मजरेवाडी) व रिक्षाचालक इम्तियाज‎ इस्माईल चौधरी (वय ३९ रा. विजय नगर,‎ सोलापूर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला‎ आहे. लोकमान्य नगर मजरेवाडी‎ परिसरात रिक्षा (एम एच १३ सीटी ८१०९)‎ यात इंधन भरताना सापडला. ९ भारत गॅस‎ कंपनीचे सिलिंडर टाकी, एक विद्युत‎ मोटार, एक वजन काटा, १ रिक्षा जप्त‎ केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस‎ निरीक्षक सुनील दोरगे यांनी दिली. ही‎ कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक‎ श्रीनाथ महाडिक यांच्या पथकाने केली.‎

बातम्या आणखी आहेत...