आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला दिन:उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये महिला दिनानिमित्त उपक्रम

उत्तर सोलापूर7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर सोलापूर तालुक्यात महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. तालुक्यातील मार्डी, वडाळा, पाकणी या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पाकणी येथे झालेल्या कार्यक्रमाला जिल्हा कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे कृषी उपसंचालक राजकुमार मोरे व तालुका कृषी अधिकारी मनीषा मिसाळ या उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी सरपंच शोभा गुंड उपस्थित होत्या. या वेळी भाजप नेते सुनील गुंड, डॉ. सुवर्णा चौरे, श्यामल गुरव, रेश्मा नागटिळक आदी उपस्थित होते. या वेळी महिलांसाठी संगीत खुर्ची, लिंबू चमचा, उखाणे आदी स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रमानंतर विजेत्या महिलांना पैठणी साड्यांचे बक्षीस देऊन गौरवण्यात आले. सूत्रसंचालन हजारे यांनी केले.

शबरी कृषी प्रतिष्ठान-शबरी कृषी प्रतिष्ठान व कृषी विज्ञान केंद्र सोलापूर व रुरल एज्युकेशन सोसायटी काझीकणबस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाला प्रमुख वक्त्या म्हणून जळगावच्या किसान संघाच्या जिल्हाध्यक्षा कविता वाणी या ऑनलाइन उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. लालासाहेब तांबडे उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक अशोक अक्षापुरे, उद्योजिका वनिता तंबाखे, सरपंच प्राजक्ता जाधव, चुंगीच्या सरपंच सारिका चव्हाण आदी उपस्थित होत्या.

लोकमंगल कृषी महाविद्यालय
वडाळा येथील लोकमंगल कृषी महाविद्यालयामधील कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्या स्वाती विभूते, डॉ. गणेश पवार उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य सचिन फुले होते. या वेळी प्रा. ज्योती जाधवर, प्रा. निर्मला ठोके यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला प्रा. सोनिया रणवरे, प्रा. नम्रता गोरे, सुहासिनी पारडे या उपस्थित होत्या. सानिया तांबोळी यांनी सूत्रसंचालन केले. शुभदा नान्नजकर यांनी आभार मानले.

मार्डी - मार्डी येथील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंगणवाडी सेविका श्यामल गवळी होत्या. या वेळी संगीत खुर्ची, बास्केटबॉल उखाणे स्पर्धा, डान्स, लिंबू चमचा इत्यादी कार्यक्रम पार पडले. या वेळी शामल गवळी, शांता भोगे, वैशाली गिरे, रुक्मिणी गवळी, लक्ष्मीबाई गोरे, उमा राजपूत, विमल बायस, विजामाला गिरे, शिवगंगा गिरे, लक्ष्मीबाई गिरे,या उपस्थित होत्या. आभार प्रदर्शन प्रगती भोगे यांनी सादर केले.

बातम्या आणखी आहेत...