आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनाथ, गरजू विद्यार्थ्यांसाठी:मोफत कला आणि स्पोकन इंग्लिश क्लास, सोलापुरात ​​​​​​सोनू सूद फाउंडेशनचा उपक्रम

सोलापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना महामारीच्या काळापासून संपूर्ण भारतातील वेगवेगळ्या समाजघटकांना वेगवेगळ्या माध्यमातून मदत करणारी अभिनेता सोनू सूद यांची संस्था सूद चॅरिटी फाउंडेशन सोलापुरातील आई-वडिलांचे छत्र छाया हरपलेल्या आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत कला आणि स्पोकन इंग्लिश वर्ग सुरू करण्यात आले आहेत.

या दोन कलाच्या माध्यमातून कलाकार विपुल मिरजकर यांच्यामार्फत चित्रकला, पेंटिंग कलेचे आणि प्रा. नागराज खराडे यांच्यामार्फत इंग्रजी संभाषण कौशल्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या दोन्ही कोर्सेस ची सुरुवात सोमवार, ७ नोव्हेंबर रोजी झाली असून आठवड्यातून तीन दिवस कला आणि तीन दिवस स्पोकन इंग्लिशचे वर्ग घेतले जात आहेत.

यासाठी सोलापुरातील दोन युवकांनी प्रयत्न केला असून या दोघांनी अभिनेता सोनू सूद यांची भेट घेतली आहे. त्यानंतर सोलापुरातल्या संपूर्ण आर्थिक परिस्थिती विषयी त्यांना सांगितले आणि सोलापुरात ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजी बोलायचं आहे कला शिकायचे आहे पण त्यांच्याकडे आर्थिक होत नाही अशा विद्यार्थ्यांना मदत करण्याचा आवाहन केले.

त्यावेळी क्षणाचाही विलंब न करता सूद यांनी आपण याकरिता तयार असल्याची भूमिका स्पष्ट केली आणि याकरिता काय खर्च येईल किंवा कशा पद्धतीने आपल्याला हे करता येईल याचे चर्चा केले त्यावर विपुल मिरजकर आणि नागेश खराडे यांनी कोणत्याही प्रकारचा खर्च आला तर तो आमच्या स्तरावर आम्ही निभवू असे सांगत हा शिवधनुष्य पेलला आहे.

स्वतः केला व्हिडिओ

सोनू सूद यांनी स्वतः व्हिडिओद्वारे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन केले असून या उपक्रमाचे उद्घाटन स्वतः सोनू सूद यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी आणि सोलापूरचे तत्कालीन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या उपस्थितीत आभासी माध्यमातून केले होते. या उपक्रमासाठी जवळपास २०० विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली असून पन्नास विद्यार्थ्यांना स्पोकन इंग्लिश वर्गासाठी तर २५ विद्यार्थ्यांना कलावर्गासाठी प्रवेश देण्यात आले आहे.

युवक युवतींनी लाभ घ्यावा

सोलापुरातल्या युवक युवतींनी अभिनेते सोनू सूद यांनी सुरू केलेल्या या अनोख्या उपक्रमांचा लाभ घ्यावा. फाउंडेशनच्या उदात्त हेतूचा सामान्य युवक युवतींपर्यंत मदतीचा हात पोहोचवा याकरिता ही योजना आखली आहे. त्यानुसार ज्यांच्याकडे खरंच पैसे नाहीत अशा विद्यार्थ्यांनी संभाषण कौशल्य आणि कला या दोन्ही प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. - प्रा. नागेश खराडे, विपुल मिरजकर

बातम्या आणखी आहेत...